गेल्या काही वर्षांमध्ये अनेक स्टारकिडने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये आलिया भट्ट, इशान खट्टर, जान्हवी कपूर, सारा अली खान या स्टारकिडची नाव आवर्जुन घेतली जातात. बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या या स्टारकिडने त्यांच्यातील अभिनयाची चुणूक दाखविल्यानंतर यावर्षीदेखील काही स्टारकिड बॉलिवूडच्या मार्गावर असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्येष्ठ अभिनेते डॅनी डेन्झोपा यांचा मुलगा रिंझिंग डेन्झोपा आता बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट अॅक्शन-थ्रिलर असून ‘स्क्वॅड’ असं त्याचं नाव आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून आणखी एक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रिंझिंगसोबत झळकणारी ही अभिनेत्री मालविका राज असून ती ज्येष्ठ अभिनेत्री अनिता राज यांची भाची आहे. ‘कभी खुश कभी गम’ या चित्रपटात लहानपणीच्या ‘पू’ची भूमिका साकारणारी हीच ती मालविका.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘चित्रपटात साहसदृश्य, थरार आणि रोमान्स हे सर्वकाही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मी त्यात अरिया नामक भूमिका साकारत असून तिला शस्त्रांची उत्तम माहिती असते,’ असं मालविका म्हणाली. रिंझिंग आणि मालविका लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. इतकंच नव्हे तर दोघांचं शिक्षणसुद्धा एकाच शाळेत झालं.

‘स्क्वॅड’चे शूटिंग येत्या एप्रिलमध्ये मुंबईत सुरु होणार आहे. निलेश सहाय या चित्रपटाची निर्मिती करत असून प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही.