बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. हृतिक रोशन आणि अभिनेत्री सबा आझाद हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोललं जात आहे. अनेकदा ते दोघेही एकत्र फिरताना, डिनर डेटवर जातानाही दिसले होते. काही दिवसांपूर्वीच सबा आणि हृतिक हातात हात घालून मुंबई विमानतळावर दिसले होते. त्यानंतर ते दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोललं जात होतं. नुकतंच अभिनेत्री पूजा बेदीने यावर स्पष्टीकरण देत त्यावर शिक्कामोर्तब केले होते.

हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खानने गोव्यामध्ये हॉटेल सुरु केल्याच्या निमित्ताने एका पार्टीचे आयोजन केले होते. या सुझान खान, तिचा बॉयफ्रेंड अर्सलन गोणी, हृतिक रोशन आणि त्याची कथित गर्लफ्रेंड सबा आझादही सहभागी झाले होते. यासोबत त्यांचे इतर मित्रही यावेळी पार्टीत सहभागी झाले होते.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
hina khan cancer battle
कर्करोगाशी लढा देणाऱ्या हिना खानने शेअर केले फोटो; प्रकृतीबद्दल अपडेट देत म्हणाली, “गेले १५ ते २० दिवस माझ्यासाठी…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…

हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खानला बॉयफ्रेंडने दिल्या खास शुभेच्छा, म्हणाला “डार्लिंग…”

सुझान खानने दिलेल्या या पार्टीत अभिनेत्री पूजा बेदीही सहभागी झाली होती. या पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत होते. त्यावेळी अनेक चाहत्यांच्या मनात हृतिक रोशन, सबा आझाद, सुझान खान आणि अर्सलन गोणी यांच्याबद्दल विविध प्रश्न निर्माण झाले होते. हृतिक आणि सबा तर दुसरीकडे सुझान आणि अर्सलन हे एकमेकांना डेट करत असल्यावरही अनेकांनी शिक्कामोर्तब केलं होतं. मात्र नुकतंच या सर्वांवर पूजा बेदीने स्पष्टीकरण दिले आहे.

बॉम्बे टाईम्सने पूजाला या चौघांबद्दलही प्रश्न विचारला होता. त्यावर ती म्हणाली, “कृपया मला हृतिक आणि सबाबाबत काहीही विचारू नका. पण मला या गोष्टींचा नक्कीच आनंद आहे की हृतिक आणि सुझान या दोघांनाही पुन्हा एकदा त्याचे प्रेम मिळाले आहे. पण तरीही ते दोघेही एकमेकांशी कायमच आदराने वागताना दिसतात. ते दोघेही एकमेकांना नेहमीच पाठिंबा देत असतात, याचे मला कौतुक वाटते.”

हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खानच्या गोव्यातील हॉटेलचा INSIDE व्हिडीओ पाहिलात का?

दरम्यान हृतिक आणि सुझानचा २०१४ मध्ये घटस्फोट झाला. पण मुलांसाठी ते दोघे नेहमी एकत्र येताना दिसतात. सध्या सुझान अर्सलनला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. अर्सलन अल्ट बालाजीच्या ‘मैं हीरो बोल रहा हूं’ या सीरिजमध्ये दिसला होता. यात त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती.

Story img Loader