एकेकाळच्या बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे पूजा बेदी. सध्या पूजा बेदीची मुलगी अलाया फर्नीचरवाला चर्चेत आहे. तिने काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. पदार्पण करताच अलायाच्या अफेअरच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. दरम्यान एका मुलाखतीमध्ये पूजा बेदीने यावर वक्तव्य केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पूजाची मुलगी अलाया आणि ऐश्वर्य ठाकरे यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. या विषयी एका मुलाखतीमध्ये विचारताच पूजाने तिचे मत मांडले आहे. ‘अलायाच्या खासगी आयुष्याविषयी सतत चर्चा होणारच. माझ्या काळात सर्व गोष्टी वेगळ्या होत्या. त्या वेळी बॉयफ्रेंड नसणे, अविवाहित असणे, व्हर्जिन असणे एका अभिनेत्रीसाठी गरजेचे होते. आज प्रत्येक व्यक्तीची पर्सनल लाइफ आहे. ती आपल्या पद्धतीने जगण्याचा हक्क देखील आहे.’
View this post on Instagram
आणखी वाचा : ‘डॅडी’ झाले आजोबा, नव्या पाहुणीचे झाले आगमन
पुढे पूजा बेदीने अभिनेत्री करीना कपूर खानचे उदाहरण दिले आहे. ‘लग्नानंतरही करीना कपूर खान चांगल्या प्रोजेक्टमध्ये काम करत आहे. कारण प्रेक्षकांनी त्यांची मानसिकता बदलली आहे. हे बदल सोशल मीडियामुळे झाले आहेत. त्यासाठी मी सोशल मीडियाचे आभार मानते’ असे पूजा पुढे म्हणाली.
ऐश्वर्य हा बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि स्मिता ठाकरे यांचा मुलगा आहे. त्याला आणि अलयाला बऱ्याचवेळा एकत्र पाहिले आहे. अलायाने ‘जवानी जानेमन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाच्या प्रिमिअरला ऐश्वर्यने हजेरी लावली होती. तर अलायाने तिच्या २२व्या वाढदिवसाच्या पार्टीतील ऐश्वर्यसोबतचे फोटो पोस्ट केले होते.