Pooja Bhatt on Old man Beaten over suspicion of carrying beef : गोमांस बाळगल्याच्या संशयावरून हरियाणामध्ये भंगार गोळा करणाऱ्या एका मजुराची जमावाने हत्या केल्याचं प्रकरण ताजं असतानाच अशीच एक घटना महाराष्ट्रात घडली आहे. नाशिकमध्ये एका ट्रेनमध्ये तरुणांच्या एका गटाने गोमांस बाळगल्याच्या संशयावरून एका वृद्धाला मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या प्रकरणी आता रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ७२ वर्षीय वृद्ध व्यक्ती गोमांस घेऊन ट्रेनमधून प्रवास करत असल्याच्या संशयातून त्याला सहप्रवाशांनी बेदम मारहाण केली आहे. ही घटना २८ ऑगस्टची असून या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच रेल्वेने देखील या घटनेची दखल घेतली आहे. छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील याप्रकरणी कडक कारवाईची मागणी केली आहे.

या मारहाणीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट हिने हळहळ व्यक्त केली आहे. तसेच महाराष्ट्रात अशी घटना झाल्याचं पाहून तिला आश्चर्य वाटलं आहे. पूजाने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासह तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. आमचा गौरवशाली महाराष्ट्र जातीयवादी नाही याचा आम्हाला अभिमान आहे. याप्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई झाली पाहिजे. पूजा भट्ट हिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या पोस्टमध्ये टॅग करून कारवाईची मागणी केली आहे.

maha kumbha mela 2025 khoya paya kendra funny video
VIDEO : “ऐ राजू, हम ढूंढ रहे है रे बाबू…”, महाकुंभ मेळ्यात हरवलेल्या लोकांसाठी होतायत अशा घोषणा की, ऐकून पोट धरून हसाल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Aakhil bharatiya chitrapat mahamandal meeting held peacefully Kolhapur news
कोल्हापूर: चित्रपट महामंडळाची बैठक खेळीमेळीत झाल्याचा दावा; बाहेर गोंधळ आत शांतता
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Pooja Sawant First Makar Sankrant dance video
ऑस्ट्रेलियात पूजा सावंतचा बहिणीसह जबरदस्त डान्स! पहिल्या संक्रांतीला मराठमोळा साज, पाहा व्हिडीओ
Punha kartvya ahe
Video : “आता शिक्षेला…”, वसुंधरा व तनयाला जलसमाधी घ्यावी लागणार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’मध्ये काय घडणार?
If Diva Ratnagiri train does not start from Dadar then Gorakhpur train will be stopped
दिवा रत्नागिरीला दादरवरून सुरू न झाल्यास गोरखपूर रेल्वेगाडी रोखू , प्रवाशांचा इशारा
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो

हे ही वाचा >> Haryana Mob Lynching : गोमांस खाल्ल्याच्या संशयातून बेदम मारहाण करत मजुराची हत्या; एकजण गंभीर, सात आरोपी गजाआड

धुळे सीएसएमटी ट्रेनमध्ये तरुणांची वृद्धाला मारहाण

धुळे – सीएमएमटी एक्सप्रेसमध्ये २८ ऑगस्ट रोजी एक धक्कादायक घटना घडली. मूळचे जळगावचे रहिवासी असलेले एक वृद्ध प्रवासी कल्याणमध्ये राहणाऱ्या त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी जात होते. ते या ट्रेनमध्ये चढले होते. नाशिक रेल्वे स्थानक गेल्यानंतर या वृद्धाचे बसण्याच्या जागेवरून काही तरूणांशी भांड झाले. त्यानंतर त्या तरुणांनी वृद्धाकडे गोमांस असल्याचा संशय व्यक्त करत त्यांच्या सामानाची तपासणी केली. त्यावर त्या वृद्धाने सांगितलं की मी म्हशीचे मांस घेऊन जात आहे. त्यानंतर ट्रेनमधील टोळक्याने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. काही तरूणांनी या घटनेचे व्हिडीओ शूट करून समाजमाध्यमांवर व्हायरल केले आहेत.

Story img Loader