Pooja Bhatt on Old man Beaten over suspicion of carrying beef : गोमांस बाळगल्याच्या संशयावरून हरियाणामध्ये भंगार गोळा करणाऱ्या एका मजुराची जमावाने हत्या केल्याचं प्रकरण ताजं असतानाच अशीच एक घटना महाराष्ट्रात घडली आहे. नाशिकमध्ये एका ट्रेनमध्ये तरुणांच्या एका गटाने गोमांस बाळगल्याच्या संशयावरून एका वृद्धाला मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या प्रकरणी आता रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ७२ वर्षीय वृद्ध व्यक्ती गोमांस घेऊन ट्रेनमधून प्रवास करत असल्याच्या संशयातून त्याला सहप्रवाशांनी बेदम मारहाण केली आहे. ही घटना २८ ऑगस्टची असून या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच रेल्वेने देखील या घटनेची दखल घेतली आहे. छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील याप्रकरणी कडक कारवाईची मागणी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा