निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या कुटुंबीयांबद्दल नेहमीच धक्कादायक खुलासे होताना दिसतात. अनेकदा हैराण करणारी वृत्त देखील समोर येतात. पण भट्ट कुटुंबीयांमध्ये खूप चांगलं बॉन्डिंग असल्याचं नेहमीच पाहायला मिळतं. अलिकडेच आलिया भट्टच्या लग्नात संपूर्ण कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. अगदी महेश भट्ट यांच्या पहिल्या पत्नीची मुलं राहुल आणि पूजा देखील या लग्नाला उपस्थित होते. मात्र एका मुलाखतीत पूजा भट्टनं सोनी राजदान यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा केला होता. महेश भट्ट यांच्याशी लग्न केल्यानंतर सोनी राजदान यांना पश्चाताप व्हायचा असं एका मुलाखतीत पूजानं सांगितलं होतं.
बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांनी १९७० मध्ये Lorraine Bright सोबत लग्न केलं होतं. या दोघांनी पूजा आणि राहुल भट्ट ही दोन मुलं आहेत. पण १९८६ मध्ये महेश भट्ट यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट देत सोनी राजदान यांच्याशी लग्न केलं. सोनी राजदान आणि महेश भट्ट यांनी शाहीन आणि आलिया या दोन मुली आहेत. मात्र सावत्र पूजा भट्टसोबत सोनी राजदान यांचं चांगलं बॉन्डिंग आहे. याचा खुलासा एका मुलाखतीत स्वतः पूजा भट्टनं केला होता.
आणखी वाचा- ‘सलमान खानलाही जमलं नाही ते बहीण अर्पितानं करून दाखवलं!’ सोशल मीडियावर होतंय कौतुक
‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत पूजा भट्टनं सावत्र भावंड आणि आई सोनी राजदान यांच्यासोबतच्या नात्यावर भाष्य केलं होतं. तिनं या मुलाखतीत एका ट्रीपबद्दल सांगितलं होतं. त्यावेळी सोनी राजदान यांनी पूजाला सांगितलं होतं की, त्यांना महेश भट्ट यांच्याशी लग्न केल्याचा पश्चाताप होत आहे. यावर पूजानं त्यांना ज्याप्रकारे समजावलं ते फारच कौतुकास्पद होतं.
आणखी वाचा- करण जोहरसोबतच्या वादावर कार्तिक आर्यननं पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाला…
पूजा भट्ट म्हणाली, “मी एका अशा वडिलांसोबत लहानाची मोठी झाले ज्यांनी दुसरं लग्न केलं. त्यांचं दुसरं कुटुंब आहे. पण मला असं वाटत नाही की सोनी राजदाननं काही चुकीचं केलं. आम्ही दोघी कुन्नूरला गेलो होतो. ती बाहेर बसली होती आणि ती मला म्हणाली, पूजा मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मी स्वतःला गुन्हेगार मानते. तुझ्या वडिलांशी लग्न केल्याचा मला पश्चाताप होतो. यावर मी तिला म्हटलं, तुला स्वतःला गुन्हेगार मानण्याची गरज नाही. कारण तू कोणाचाही संसार उद्धस्त केलेला नाहीस. ते लग्न काही वर्षांपूर्वीच संपलं होतं.”