बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे सध्या तिच्या चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. कामानिमित्त पूजा जगभरात प्रवास करत असते. आता देखील ती मुंबईबाहेरच आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने मुंबईमधून दुसऱ्या ठिकाणी जात असताना पूजाबरोबर धक्कादायक प्रकार घडला आहे. इंडिगोच्याच एका कर्मचाऱ्याने पूजाला प्रवासादरम्यान चुकीची वागणूक दिली. हा सगळा घडलेला प्रकार पूजाने ट्विट करत सांगितला आहे.

आणखी वाचा – VIDEO : अमिताभ बच्चन यांचा ‘ब्रम्हास्त्र’मधील थक्क करणारा लूक, बिग बींना पाहून चाहते म्हणाले…

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार
Bollywood actor varun Dhawan reveals wife of a powerful man broke into his house without permission
वरुण धवनच्या घरात घुसली होती चाहती, प्रसंग सांगत अभिनेता म्हणाला, “एका पॉवरफुल व्यक्तीची ती पत्नी होती अन्…”
vivek oberoi rani mukerji sathiya
पोलीस आले अन्…; जेव्हा राणी मुखर्जीच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये लपलेला विवेक ऑबेरॉय, नेमकं काय घडलेलं?
Marathi actress tejashri Pradhan talk about her future life partner
अभिनेत्री तेजश्री प्रधानला ‘असा’ हवाय जोडीदार, म्हणाली, “फक्त नात्यात…”
Sharayu Sonawane
Video : ‘पारू’ फेम अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ; श्वेता खरात कमेंट करत म्हणाली…

अभिनेत्री पूजा हेगडेबरोबर नेमकं काय घडलं?
“इंडिगोचा कर्मचारी विपुल नकाशेने आम्हाला अगदी वाईट वागणूक दिली, या गोष्टीमुळेच मी खूप दुःखी झाले. कोणतंही कारण नसताना त्याने उद्धटपणे आणि धमकीच्या स्वरुपामध्ये आमच्याशी संवाद साधला. मी अशाप्रकारचं ट्विट कधीच करत नाही. पण आमच्याबरोबर घडलेली ही घटना खरंच खूप भयानक आहे.” पूजाने ट्विट करत घडलेला सगळा प्रकार सांगितला आहे.

पूजाचं ट्विट पाहून इंडिगो एअरलाइन्सने लगेचच अभिनेत्रीची माफी मागितली. इंडिगोने ट्विट करत म्हटलं की, “तुमच्याबरोबर घडलेल्या प्रकाराबाबत आम्ही तुमची माफी मागत आहोत. तुमची संपूर्ण माहिती आम्हाला मॅसेजच्या स्वरुपात पाठवा. लगेचच आम्ही तुमच्याशी संवाद साधू.” पूजाबरोबर घडलेला हा प्रकार फारच विचित्र होता.

आणखी वाचा – “महाराष्ट्रात आत्ताच पळून यावं वाटतं कारण…”, हिमाचल प्रदेशमध्ये गेलेली प्राजक्ता माळी असं का म्हणाली?

पूजाने ट्विट केल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. विपुलने फक्त पूजालाच नव्हे तर इतर प्रवाशांना देखील चुकीची वागणूक दिली होती. पूजाच्या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी त्यांचा अनुभव सांगायला सुरुवात केली. पूजासारख्या अभिनेत्रीबरोबर देखील असा प्रकार घडतो हे खरंच धक्कादायक आहे.

Story img Loader