दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांच्या ‘मोहंजदडो’चित्रपटाबाबत गेले कित्येक दिवस चर्चा सुरु आहे. यात हृतिक रोशन मुख्य भूमिकेत दिसणार असल्यामुळे त्याच्या चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. मात्र, यात हृतिकसोबत कोणती अभिनेत्री रोमान्स करताना दिसणार याबाबत काहीच थांगपत्ता नव्हता. पण यावरील पडदा आता उठला असून, हृतिकसोबत कोणी बॉलीवूड दिवा नाही तर नवअभिनेत्री पूजा हेगडे दिसणार आहे.
“पूजाला चित्रपटात घेऊन मला फार आनंद होत आहे. तिच्यातील आकर्षकता ही भूमिकेला आणखीन मोहक, दर्जेदार बनवेल.”, असे गोवारीकर म्हणाले. गोवारीकरने यापूर्वी ‘लगान’मध्ये ग्रेसी सिंग आणि ‘स्वदेस’मध्ये गायत्री जोशी हे नवीन चेहरे बॉलीवूडमध्ये आणले होते. यावर्षी ‘मोहंजदडो’ च्या चित्रीकरणास सुरुवात होणार असून याच्या पूर्व निर्मितीचे काम जोरात सुरु झाले आहे.

Story img Loader