आपल्या आवडत्या कलाकारांच्या खासगी आयुष्यातील गुजगोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता अनेक चाहत्यांना असते. खास करून, आवडती डिश, आवडता रंग तसेच त्यांची प्रेम प्रकरणं अशा अनेक गोष्टीचा मागोवा ही चाहतेमंडळी घेत असतात. अश्या या चाहत्यांसाठी, एक गमतीदार बातमी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : ही मराठी अभिनेत्री करतेय अर्जितला डेट?

श्रेयश जाधव निर्मित आणि समीर हेमंत जोशी दिग्दर्शित ‘बसस्टॉप’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक भन्नाट किस्सा आहे. तो म्हणजे, पूजा सावंतला पाण्याची फार भीती वाटते. त्यातही स्विमिंग पूल म्हटलं तर नको रे देवा अशी पूजाची अवस्था होते. मात्र सिनेमाच्या एका सीनसाठी पुजाला पाण्यात उडी मारावी लागणार होती. अनिकेत विश्वासरावला पाण्यात धक्का मारून तिला स्वतः पाण्यात उडी मारायची होती, त्यानुसार सगळे ठरले देखील. दिग्दर्शकांनी अॅक्शन म्हटले, आणि पूजाने अनिकेतला पाण्यात ढकलले, मात्र स्वतः पाण्यात उडी मारायची सोडून तिने चक्क पळच काढला.

वाचा : जाणून घ्या ‘चला हवा येऊ द्या’मधील विनोदवीरांचे मानधन

पूजाच्या या कृतीमुळे टीममध्ये सर्वत्र हशा पिकला. मात्र रिटेकमध्ये पूजाने हिम्मत करुन सीन पूर्ण केला. अशी ही चित्रीकरणादरम्यान झालेली छोटीशी गंमत जरी असली, तरी याहून अधिक भन्नाट गोष्टी चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. यात पूजा आणि अनिकेतबरोबरच अमृता खानविलकर, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे या कलाकारांची धम्माल देखील पाहायला मिळणार आहे. पडद्यावरच्या या सर्व कलाकारांच्या गंमतीजमती २१ जुलैला प्रेक्षकांना आपल्या नजीकच्या सिनेमागृहात पाहता येणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja sawant aniket vishwasrao fun moment on bus stop movie set