मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. मराठी चित्रपटसृष्टीपासून ते अगदी बॉलिवूड चित्रपटांवरही आपल्या अभिनयाची छाप सोडणारी पूजा सावंत सध्या तिचा चित्रपट ‘दगडी चाळ २’मुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. पण या व्यतिरिक्त एका खास कारणामुळे पूजा सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ज्यात तिने बॉलिवूड अभिनेत्यावर क्रश असल्याची कबुली दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूजा सावंतने नुकतीच सुबोध भावेचा लोकप्रिय शो ‘बस बाई बस’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतानाच तिच्या क्रशबद्दलही सांगितलं. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री बॉयफ्रेंड असलेला हा अभिनेता पूजाला खूप आवडतो आणि त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा असल्याचं ती या कार्यक्रमात म्हणाली आहे. तिचा हा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा- पूजा सावंतला करायचं आहे या लोकप्रिय अभिनेत्रीच्या बायोपिकमध्ये काम…!

सुबोध भावेच्या ‘बस बाई बस’ कार्यक्रमात पूजा सावंतला काही अभिनेत्याचे फोटो दाखवून त्यांच्याबद्दल काय वाटतं हे सांगायचं होतं. यावेळी अभिनेत्री कियारा आडवाणीचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्राचा फोटो समोर आल्यावर पूजा लाजत म्हणाली, “सिद्धार्थ तू मला खूप आवडतोस आणि आवडेल मला जर तुझ्याशी माझं लग्न झालं तर…” पूजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा- प्रियांका चोप्राचा पती निक जोनस समलैंगिक? एक्स गर्लफ्रेंडने केला मोठा खुलासा

‘झी मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओवर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पडला आहे. दरम्यान अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राबद्दल बोलायचं तर तो अभिनेत्री कियारा आडवाणीशी रिलेशनशिपमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने या नात्याची कबुली ‘कॉफी विथ करण ७’च्या एका एपिसोडमध्ये दिली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja sawant open up about her crush on sidharth malhotra and want to marry with him mrj