‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये खळबळजनक विधानांनी चर्चेत असणा-या आणि अधिकाधिक वादग्रस्त स्पर्धकांना सहभागी करुन घेतले जाते. त्यामुळे यंदाच्या पर्वात ‘नशा’ चित्रपटाची अभिनेत्री पूनम पांडेचे नाव ‘बिग बॉस’च्या यादीत असण स्वाभाविक आहे. पूनम तिच्या अर्धनग्न फोटोंमुळे आणि विधानांमुळे चर्चेत राहणारी मॉडेल आहे. ‘बिग बॉस’ निर्मात्यांनी पूनमला शोच्या सातव्या पर्वासाठी दोन ते अडीच कोटी देऊ केले आहेत. पण, तीन कोटींवर अडलेल्या पूनमने या शोची ऑफर धुडाकरून लावल्याचे सांगण्यात येत आहे. बिग बॉसचे निर्माते गेल्या तीन सीझनपासून पूनमला संपर्क साधत होते. पण, आर्थिक गणित जमत नसल्यामुळे पूनम या शोमध्ये झालेली नाही. मात्र, यंदाही पूनमच आर्थिक गणित काही जुळताना दिसत नाही.
यापूर्वी, पूनम ‘खतरो के खिलाडी’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती.

Story img Loader