अभिनेत्री पूनम पांडे ही तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओंमुळे ओळखली जाते. सध्या ती कंगना रणौतच्या ‘लॉक अप’ या शोमध्ये दिसत आहे. याच शोच्या एका एपिसोडमध्ये पूनम पांडेने तिला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
‘लॉक अप’मध्ये स्पर्धकांशी बोलत असताना पूनमने तिच्या आयुष्यातील संघर्षाविषयी सांगितले आहे. ‘मी कपडे काढते आणि शरीर दाखवते म्हणून तुम्ही मला निर्लज्ज म्हणू शकत नाही. जे दुसऱ्यांविषयी वाईट बोलत असतात ते लोक स्वत: तसेच असतात’ असे म्हणत पूनमने संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, तहसीन पूनावाला म्हणाला, ‘लोक पूनम पांडेचे व्हिडीओ डाउनलोड करतात आणि नंतर तिच्याविषयी वाईट बोलतात हे फार चुकीचे आहे.’ त्यावर सहमती दर्शवत पूनम म्हणाली, ‘६० मिलियन फॉलोवर एका महिन्यात असेच नाही येत ना.. हे कोणते लपलेले फॉलोअर्स आहेत. हे लोक रात्री व्हिडीओ बघतात आणि सकाळी उठून मला ट्रोल करतात, माझ्यावर कमेंट करतात. मला हे लोक कोण आहेत हे जाणून घ्यायचे आहे.’
पुढे पूनम म्हणाली, ‘त्यांना माझी नेहमी चिंता असते. मी लग्न कधी करणार, मी कसे कपडे घालते, मी आई कधी होणार असे प्रश्न विचारणाऱ्यांना मी सांगू इच्छिते की ही सर्व माझी जबाबदारी आहे. माझे आयुष्य आहे आणि मी ते योग्य पद्धतीने सांभाळेन. मी ते कसे जगायचे हे मला कुणी सांगू शकत नाही.’