आयुष्यात पहिल्यांदाच माझ्यावर करण्यात आलेल्या विनोदांचा मी आनंद घेत आहे… आणि हे सर्व विनोद मी वाचते देखील… क्रेझी, हे टि्वट आहे पूनम पांडेचे. सतत विवादांनी घेरलेली अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे सध्या टि्वटरवरचा चर्चेचा विषय आहे. “#iHaveAjokeOnPoonamPandey” हा हॅशटॅग ट्रेन्ड होत आहे. पूनमचे चाहते आणि तिला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांकडून तिच्याबाबतचे अनेक विनोद ऑनलाईन शेअर करण्यात येत आहेत. हे सर्व अविश्वसनिय असल्याचे पूनम म्हणते. खरोखरीच विश्वास बसत नाही हा #iHaveAjokeOnPoonamPandey हॅशटॅग अद्याप ट्रेन्ड होत आहे… चाहत्यांच्या प्रेमासाठी आणि त्यांनी केलेल्या विनोदांसाठी पूनमने त्यांचे आभार मानले आहेत. पूनमवरील विनोदांच्या मालिकेला सोमवारपासून सुरुवात झाली, पूनमदेखील आपल्याला मिळत असलेल्या या प्रसिद्धीने खूष आहे. पूनमवर करण्यात आलेले काही विनोद वानगीदाखल येथे देत आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूनम पांडेसाठी माझ्याकडे विनोद आहे, पण तो पूनमच्या कमनीय बांध्यासारखा आहेच 😉 #iHaveAjokeOnPoonamPandey @iPoonampandey”

एकदा रजनिकांत एका मुलीला हाय सेक्सी म्हणाला… आज ती मुलगी पूनम पांडे आहे… @iPoonampandey #iHaveAjokeOnPoonamPandey

फक्त आलोकनाथजीच पूनम पांडेच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकतात. #iHaveAjokeOnPoonamPandey

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poonam pandey thanks twitterati for jokes on her