सोशल नेटवर्किंगवरील ट्विटर आणि फेसबुकवर आपली हॉट छायाचित्रे अपलोड करुन प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱया पूनम पांडेची फेसबुकने ‘नशा’ उतरवली आहे. फेसबुकने पूनम पांडेचे अकाऊंट चक्क ‘डिअॅक्टिव्ह’ करुन टाकले आहे. याची माहिती पूनमने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांना दिली आहे.

 

नुकतेच पूनम पांडेने ‘आईस बकेट चॅलेंज’मध्ये सहभागी होत आपली हॉट छायाचित्रे फेसबुकवर शेअर केली होती. या छायाचित्रांमुळेच फेसबुककडून पूनमचे अकाऊंट डिअॅक्टिव्ह करण्यात आल्याचे बोलले जात आहे. आपले फेसबुक अकाऊंट डिअॅक्टिव्ह झाल्याने पूनमसुद्धा त्रस्त झाली आहे.
पूनमने आईस बकेट चॅलेंज स्वीकारत आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवर बिकनीवरील व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर तिचे फेसबुक अकाऊंट अचानक डिअॅक्टिव्ह झाले. 

Story img Loader