९० च्या दशकातील मुलांचं बालपण हे खूप रम्य होतं, कारण तेव्हा तंत्रज्ञान एवढं प्रगत नव्हतं आणि मनोरंजनाची कमी साधनं उपलब्ध होती. याचदरम्यान ‘कार्टून नेटवर्क’ या चॅनलने त्या काळातील मुलांच्या बालपणीच्या दिवसात एक निखळ मनोरंजन आणायचा प्रयत्न केला. त्याच काही कार्टून्सपैकी एक चिरतरुण कार्टून शो म्हणजे ‘पॉपॉय द सेलर मॅन’.

कित्येक मुलांना पालेभाजी खाण्याची सवय लावणारा आपल्या सगळ्यांचा लाडका पॉपॉय ९४ वर्षांचा झाला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक या कार्टूनचा चाहता होता. संकटकाळात पालकाची भाजी खाऊन शक्ति मिळवणारा आणि समोरच्या गुंडाची बेदम धुलाई करणाऱ्या पॉपॉयची आजही लोक आठवण काढतात. आज याच पॉपॉयच्या जन्मामागील काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

Video Shows Father And Daughter love
VIDEO: वडिलांजवळ ढसाढसा रडली नवरी, तर दुसरीकडे बाबांच्या कुशीत खेळतेय चिमुकली; बघता क्षणी डोळ्यात पाणी आणेल ‘हा’ क्षण
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
The woman watered to the monkey
‘आई तू खरंच देवासारखी आहेस…’ तहानलेल्या माकडाला मिळाली आईची माया… VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “आई ती आईच”
Father Disappointed After Seeing Daughters English In Whatsapp Chat Viral on social media
PHOTO: वडिलांनी मुलीला ४० हजार पाठवल्याचा मेसेज केला; यावर मुलीचा रिप्लाय पाहून वडिल झाले शॉक; व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
papad selling boy viral video
“परिस्थिती नाही संस्कार महत्त्वाचे” पापड विक्रेत्या मुलाचे ‘ते’ शब्द ऐकून तुम्हीही कराल पालकांचे कौतुक
A Father fights to save 9 years old daughter with a tiger shocking video goes viral on social Media
बाप तो बापच असतो! नऊ वर्षाच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी वाघाशी भिडला बाप; VIDEO पाहून थरकाप उडेल
Parents congratulated their children for not coming home on time
‘पप्पा, मला माफ करा…’ मुलं वेळेवर घरी आली नाहीत म्हणून आई-वडिलांनी केला सत्कार… VIDEO पाहून येईल हसू
Madhuri Dixit recalls when her 2 year old son stood up against bully
‘तुला माहितीये का मी कोण आहे?’ माधुरी दीक्षितचा अडीच वर्षांचा मुलगा ‘त्या’ला नडलेला; अभिनेत्री म्हणाली, “अरिनला धक्का…”

आणखी वाचा : अनुपम खेर यांनी रागात लगावलेली पत्रकाराच्या कानशिलात; सलमान, संजयसह सारं बॉलिवूड उभं राहिलं अभिनेत्याच्या पाठीशी

अमेरिकन कार्टूनिस्ट एलझी क्रिसलर सेगर यांनी पॉपॉयला जन्म दिला. ते खरे याचे जनक. त्यानंतर काही दिवसांतच हे पात्र प्रचंड लोकप्रिय झालं. हे पात्र नंतर कॉमिक बुक, टेलिव्हिजन कार्टून, व्हिडिओ गेम्समध्येसुद्धा समाविष्ट करण्यात आलं. १९८० मध्ये दिग्दर्शक रॉबर्ट ऑल्टमॅन यांनी पॉपॉय या पात्रावर बेतलेला एक लाईव्ह अॅक्शन चित्रपटदेखील बनवला.

पॉपॉय हे असं पहिलं कार्टून आहे ज्याची मूर्ती घडवण्यात आली. १९३७ मध्ये टेक्ससमध्ये डबा फोडून पालक खाणाऱ्या पॉपॉयची भव्य मूर्ती साकारण्यात आली. लहान मुलांना उत्तम अन्नाचे महत्त्व अगदी सोप्या आणि मजेशीर पद्धतीने पटवून देणाऱ्या पॉपॉयचे आजही भरपूर चाहते आहेत.

Story img Loader