अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता अर्जुन कपूरच्या (Arjun Kapoor) ‘टू स्टेट्स’ (Two States) चित्रपटात आलियाच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेता आणि पटकथालेखक शिव कुमार सुब्रह्मण्यम (Shivkumar Subramaniam) यांचं निधन झालं. काल १० एप्रिल रोजी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिव कुमार सुब्रमण्यम हे अनेक दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचे म्हटले जाते. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शिव कुमार सुब्रमण्यम यांच्या निधनाची बातमी दिली आहे. “अत्यंत दु: खद अंतकरणाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की अत्यंत प्रतिभावान कलाकार शिव सुब्रह्मण्यम यांचं निधन झालं”, अशा पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.
शिव कुमार यांच्या नातेवाईकाने ‘नवभारत टाइम्स ऑनलाइन’ला सांगितले की, शिव कुमार सुब्रमण्यम बरेच दिवस आजारी होते. ते स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देत होते. मात्र, दोन महिन्यांपूर्वी ११ फेब्रुवारी रोजी मुलाचा मृत्यू झाला. त्यांच्या एकुलता एक मुलगा जहान होता आणि त्याचा ब्रेन ट्यूमरमुळे मृत्यू झाला. ते आधीच आजारी होते पण त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर त्यांना जसा धक्का बसला होता.
शिवकुमार सुब्रमण्यम यांनी विधू विनोद चोप्रा यांच्या ‘परिंदा’ आणि सुधीर मिश्रा यांच्या ‘हजारों ख्वैशीं ऐसी’ या चित्रपटाची पटकथा लिहिली. या चित्रपटांशिवाय शिव कुमार ‘तीन पट्टी’, ‘प्रहार’ आणि राणी मुखर्जी स्टारर ‘हिचकी’ या चित्रपटातही दिसले होते. शिवकुमार सुब्रमण्यम यांनी ‘मुक्ती बंधन’ या टीव्ही शोमध्येही काम केले होते.