बॉलीवूडचा लोकप्रिय नायक सलमान खान आणि लोकप्रिय गायक अरिजित सिंह यांच्यात गेले नऊ वर्षांहून अधिक काळ धुमसत असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. ‘टायगर ३’ या चित्रपटाच्या निमित्ताने अरिजितने सलमानसाठी गायलेल्या ‘लेके प्रभु का नाम’ या पहिल्यावहिल्या गाण्याची झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. खुद्द सलमान खानने आपल्या समाजमाध्यमावरून या गाण्याची माहिती देतानाच ‘ओ हाँ.. यह है अरिजित सिंह का पहला गाना मेरे लिए ..’ म्हणत ही खुशखबर दोघांच्या चाहत्यांना दिली आहे.

 ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधून बाहेर पडणाऱ्या अरिजित सिंहची छबी माध्यमांनी टिपली होती. सलमान खानबरोबर झालेल्या वादामुळे अरिजितला अनेक संधींना मुकावे लागले, त्याने जाहीर माफी मागूनही आजवर सलमानने आपल्या कोणत्याही चित्रपटात त्याला गाण्याची संधी दिली नव्हती. त्यामुळे अचानक नऊ वर्षांनंतर अरिजितला त्याच्या घरातून बाहेर पडताना पाहिल्यानंतर त्यांच्यातील वाद संपुष्टात आल्याची कुणकुण सगळय़ांना लागली होती. आता सलमाननेच आपल्यासाठी अरिजितने गाणे गायले असल्याची वर्दी देत या वादावर पडदा टाकला आहे. ‘टायगर ३’ या सलमानच्या आगामी चित्रपटातील ‘लेके प्रभु का नाम’ हे पहिले गाणे आज प्रकाशित झाले आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांनी गायले आहे.

Bollywood Artists News, Marathi news
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच नाही तर सलमान खान, रवीना टंडन यांच्यासह ‘या’ कलाकारांवरही झाला होता हल्ला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Kartik Aaryan Recalls His Struggle
वारंवार नकार तरी मानली नाही हार; कार्तिक आर्यनने शेअर केल्या संघर्ष काळातील आठवणी, म्हणाला, “मला लाज…”
ibrahim ali khan took saif ali khan hospital in rickshaw
चोर मदतनीसच्या खोलीत शिरला, आरडाओरडा ऐकून सैफ आला अन्…; इब्राहिमने बाबाला रिक्षातून नेलं रुग्णालयात
saif ali khan fought intruder wife kareena and sons were at home
सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत, खरी माहिती आली समोर
Salim Khan
“काही वर्षानंतर…”, हेलन व सलमा खान यांच्यातील नात्यावर बोलताना सलीम खान म्हणाले…
yograj singh criticise aamir khan movie
आमिर खानच्या ‘त्या’ सिनेमाला युवराज सिंगच्या वडिलांनी म्हटले ‘अतिशय फालतू’; बॉलीवूड सिनेमांवरही केली टीका, म्हणाले…
aamir khan kiran rao
“त्याची आई अजूनही…”, किरण रावचं आमिर खानच्या कुटुंबाबद्दल भाष्य; त्याच्या मुलांची नावं घेत म्हणाली…

हेही वाचा >>>‘पदार्पणासाठीच पाच वर्षांची प्रतीक्षा’

काय होता वाद? २०१४ साली एका चित्रपट पुरस्कार सोहळय़ात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर आलेल्या अरिजित सिंह आणि सोहळय़ाचे सूत्रसंचालन करणाऱ्या सलमान खान यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर नाराज झालेल्या सलमानची माफी मागण्याचे हरएक प्रयत्न अरिजितने केले. या दोघांमध्ये दिलजमाई व्हावी यासाठी इंडस्ट्रीतील काहींनी प्रयत्नही केले, पण सलमानच्या निर्धारात फरक पडला नाही. उलट २०१६ मध्ये अरिजितने ‘सुलतान’ चित्रपटासाठी सलमानच्या तोंडी असलेले ‘जग घूमिया’ हे गाणे गायले होते. मात्र सलमानच्या सांगण्यावरून ते गाणे काढून त्याऐवजी राहत फतेह अली खानने गायलेल्या गाण्याचा समावेश चित्रपटात करण्यात आला. त्यावेळी अरिजितने फेसबुकवरून सलमानची जाहीर माफी मागितली. हा वाद मिटवण्याचा त्याचा अखेरचा प्रयत्न असल्याचेही त्याने स्पष्ट केले होते. त्यानंतरही या दोघांमधील दुराव्यात काही फरक पडला नाही. अखेर ‘टायगर ३’च्या निमित्ताने हे दोघेही एकत्र आले आहेत.

Story img Loader