सध्या सोशल मीडियावर असंख्य क्रिएटर्स आहेत. पण काही कंटेंट क्रिएटर्सनी आपल्यातल्या वेगळ्या कौशल्याने नेटकऱ्यांसह सेलिब्रिटींची मनं जिंकली आहेत. त्यापैकी एक म्हणजे २४ वर्षांची कंटेंट क्रिएटर चांदनी भाभदा. सोशल मीडियावर ती चांदनी मिमिक म्हणून खूप प्रसिद्ध आहे. चांदनी आलिया भट्टची हुबेहुब मिमिक्री करते. तिच्या या कौशल्याचे आलियाने देखील कौतुक केलं होतं. अशा या प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर चांदनी भाभदाने काही महिन्यांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारचा फ्लॅट खरेदी केला होता. त्यानंतर तिने आता आलिशान गाडी खरेदी केली आहे.
चांदनी भाभदाने काल, १० एप्रिलला सोशल मीडियावर नव्या गाडीसह फोटो, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. पहिल्या फोटोत चांदनी नव्या गाडीसह पाहायला मिळत आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या व्हिडीओमध्ये गाडीची पूजा-अर्चा करताना दिसत आहे. पाचव्या फोटोमध्ये चांदनी तिच्या स्वप्नवत गाडीत बसलेली पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – स्पिरिट ऑफ एक्स्टसी सोन्याचं अन्…; नीता अंबानींनी खरेदी केली आलिशान गाडी, जाणून घ्या किंमत
नव्या गाडीचे फोटो, व्हिडीओ शेअर करत चांदनीने लिहिलं आहे, “पिंगू आणि माझी पहिली गाडी. बॅलेन्स शीट टॅली करत आहे. नव्या गाडीचं आमच्या घरात स्वागत आहे.”
चांदनीच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींसह कंटेंट क्रिएटर्सने प्रतिक्रियेच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री जरीन खान, मल्हार कलांबे, हर्ष राणे, सई गोडबोले अशा अनेकांनी चांदनीला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, चांदनीच्या या नव्या गाडीची किंमत २० लाखांहून अधिक आहे.
हेही वाचा – ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेतील अभिनेता अडकला लग्नबंधनात, कोण आहे बायको? जाणून घ्या…
चांदनीचे इन्स्टाग्रामवर ४ लाख ७२ हजार फॉलोअर्स आहेत. तिने वकिलीचं शिक्षण घेतलं आहे. ती व्हीजे म्हणजे व्हिडीओ जॉकी आहे. पण ती पूर्णपणे वेळ कंटेंट क्रिएटरचं काम करते.