गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गौतमी पाटील ही सातत्याने चर्चेत आहे. तिच्या लावणीचा वाद चांगलाच गाजला होता. त्यानंतर गौतमी पाटील हे नाव महाराष्ट्राच्या मनोरंजन क्षेत्रातील सगळ्यात चर्चेतील नाव ठरलं आहे. गौतमी पाटील ही एका पंजाबी गाण्यात झळकली आहे. याचा व्हिडीओही समोर आला आहे.
गौतमी पाटील ही सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतंच गौतमी पाटीलने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या गाण्याची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे.
आणखी वाचा : “आम्हाला एकमेकांचं तोंड…” शिव ठाकरेने सांगितलं वीणा जगतापशी ब्रेकअप करण्यामागचं खरं कारण
‘तेरा पता’ असे तिच्या गाण्याचे नाव आहे. तिचे हे गाणे पंजाबी भाषेतील आहे. तिच्या गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मराठीत लोकप्रियता मिळवल्यानंतर पंजाबी गाण्यांमध्ये देखील गौतमी चमकताना दिसत आहे.
आणखी वाचा : “माझं लग्न रखडतंय कारण…” प्राजक्ता माळीने सांगितलं लग्न न करण्याचे कारण
गौतमीच्या या नव्या गाण्यावर तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर काही जण तिच्या या गाण्यातील पेहरावावरुन तिला ट्रोल करताना दिसत आहे. येत्या काळात गौतमी एका चित्रपटात दिसणार आहे, असे बोललं जात आहे.
दरम्यान गौतमीने पहिल्यांदा अकलूज येथील लावणी महोत्सवात बॅक आर्टिस्ट म्हणून गौतमीने सादरीकरण केले होते. पहिल्यांदा लावणी केल्यावर गौतमीला ५०० रुपये मानधन मिळाले होते आता आपण शो साठी हजारो रुपयांचे मानधन घेत असल्याचे गौतमीने मागे एका कार्यक्रमात सांगितले होते.