‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या या जोडीने अक्षय्य तृतीयादिवशी साखरपुडा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. याचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ते पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांना सुखद धक्का बसला. नुकतंच अक्षया देवधरच्या एक्स बॉयफ्रेंडने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अक्षया आणि हार्दिकने त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे. साखरपुड्याचे फोटो शेअर करताना अक्षयानं त्याला ‘अहा ऽऽऽ’ असे कॅप्शन दिले आहे. यात तिने दोघांच्याही नावाची आद्याक्षरं एकत्र करत हॅशटॅग म्हणून वापरला आहे. याशिवाय राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीने देखील साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याने हे फोटो शेअर करताना त्याला, ‘अखेर साखपुडा पार पडला… #अहा ऽऽऽ’ असं कॅप्शन दिलं आहे.
Video : हातात हात घालून एंट्री ते कपल डान्स, ‘असा’ पार पडला राणादा आणि अंजलीबाईंचा साखरपुडा
अक्षया आणि हार्दिकच्या साखरपुड्याच्या या फोटोवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. अक्षयाने दोन दिवसांपूर्वी शेअर केलेल्या साखरपुडाच्या फोटोंवर तिचा एक्स बॉयफ्रेंड सुयश टिळक याने कमेंट केली आहे. सुयश टिळकने या फोटोंवर ‘खूप खूप शुभेच्छा’ असे म्हटले आहे. त्यावर अक्षयानेही कमेंट केली आहे. अक्षयाने त्यावर ‘धन्यवाद’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या त्यांची ही प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Video : राणादा- पाठकबाईंचा दणक्यात साखरपुडा, एकमेकांना अंगठी घालतानाचा व्हिडीओ व्हायरल
हार्दिक जोशीसोबत साखरपुडा होण्याआधी अक्षया देवधर ही सुयश टिळकसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सुयश टिळक आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांनी कधीही आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली नव्हती. मात्र सोशल मीडियावर त्या दोघांचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर काही काळानंतर या दोघाचं ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली होती.
सुयश टिळक आणि अक्षया देवधरचं ब्रेकअप झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले होते. सुयशने अक्षयासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्री आयुषी भावे हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. सध्या ते दोघेही सुखाचा संसार सुरु आहे. तर अक्षय आणि हार्दिक या दोघांनीही नुकतंच साखरपुडा केला आहे. सध्या त्यांची सर्वत्र चर्चा सुरु आहे.