Anant Ambani Radhika Merchant 2nd Pre-Wedding : भारताचे मोठे उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानींचा छोटा मुलगा अनंत अंबानी जुलै महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहे. राधिका मर्चंट हिच्याशी अनंत अंबानीचा मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडणार आहे. अलीकडेच दोघांच्या लग्नाची पत्रिका समोर आली होती. त्यामुळे सध्या अनंत अंबानी व राधिका मर्चंट चर्चेचा विषय आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा २९ मार्चपासून क्रूझवर जोरदार सुरू आहे. इटलीमध्ये हा दुसरा प्री-वेडिंग सोहळा सुरू असून बॉलीवूडच्या सेलिब्रिटींसह अनेक दिग्गज मंडळी क्रूझवर पोहोचले आहेत. प्रसिद्ध पंजाबी गायक गुरु रंधावा देखील आपला दमदार परफॉर्मन्स करण्यासाठी क्रूझवर पोहोचला आहे. याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा – Video: ‘नवरी मिळे हिटलरला’मधील लीलाचं ‘हीरामंडी’तील ‘चौदहवी शब’ गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, नेटकरी म्हणाले, “लय भारी…”

प्रसिद्ध गायक गुरु रंधावाने क्रूझवर पोहोचण्यापूर्वीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘हाय फ्रॉम कान’, असं लिहित त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अनंत-राधिकाचं दुसरं प्री-वेडिंग ज्या क्रूझवर सुरू आहे ते आलिशान क्रूझ पाहायला मिळत आहे. यामध्ये गुरु रंधावा ‘लेवल सबके निकलेंगे, लेवल सबके निकलेंगे’ म्हणताना दिसत आहे. गायक दुसऱ्या बोटीत असून तो क्रूझवर जाताना पाहायला मिळत आहे. प्री-वेडिंगमधील त्याच्या परफॉर्मन्ससाठी तो खूप उत्साही असल्याचं दिसत आहे. अमेरिकन रॅपर पिटबुलसह गुरु रंधावा परफॉर्म करणार आहे.

याशिवाय अमेरिकन गायिका कॅटी पेरी देखील परफॉर्मन्स आहे. फ्रान्समधील ५०.९ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास ४२४ कोटींच्या व्हिलामध्ये कॅटी पेरी तिच्या गाण्यांनी धुमाकूळ घालणार आहे. ‘द सन यूके’च्या वृत्तानुसार, कॅटी पेरीला ‘ले मास्करेड’मध्ये परफॉर्मन्ससाठी अंबानी कुटुंबाकडून लाखो डॉलरचा चेक मिळाला आहे. कॅटी खासगी कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करण्यासाठी १२ ते १६ कोटी मानधन घेते. त्यानुसार तिला अंबानींकडून मानधन मिळाल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा – Video: “सौ दर्द दिए उसने जो दर्द का मरहम था…”, अजय देवगण व तब्बूच्या नव्या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

दरम्यान, अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचं १२ जुलैला मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये लग्न होणार आहे. तसंच इथे इतर कार्यक्रम आणि रिसेप्शन देखील पार पडणार आहे. १३ जुलैला रिसेप्शन असणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Popular punjabi singer guru randhawa reach at anant ambani radhika merchant pre wedding cruise party pps