‘द कपिल शर्मा शो’ हा कार्यक्रम बऱ्याच लोकांना प्रचंड आवडतो. नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी हिनेही याचे कौतुक केले होते. या शोमुळे कॅन्सरमधून बरे होण्यासाठी खूप मदत झाल्याचे तिने सांगितले होते. पण तरी अशी काही मंडळी आहेट ज्यांना कार्यक्रमम्हणजे ‘शोबाजी’ किंवा ‘दिखावा’ वाटतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतंच रॅपर रफ्तार एका यूट्यूबरला दिलेल्या मुलाखतीमध्ये या कार्यक्रमाबद्दल बोलला आहे. याबरोबरच त्याने यो यो हनी सिंगचीही खिल्ली उडवली आहे. रॅपर रफ्तारने ‘द कपिल शर्मा शो’ला वास्तविक आयुष्यात काहीच मोल नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा : रॅपर हनी सिंगवर अपहरण आणि मारहाणीचे आरोप; इव्हेंट कंपनीच्या मालकाचा धक्कादायक खुलासा

या कार्यक्रमाबद्दल विचारल्यावर रफ्तार म्हणाला, “मुळात कसं आहे की जर तुम्ही एखाद काम केलं तर तुम्ही त्या कार्यक्रमाच्या मंचावर जाऊन बढाई मारता, स्वतः किती महान आहात हे सिद्ध करायचा प्रयत्न करता. हा सगळा दिखावा असतो, लोकांसमोर तुमचं नाव होतं, घरच्यांसाठी पण ही खूप मोठी गोष्ट असते की हा कपिल शर्मा शोमध्ये जाऊन आला, तुमच्या आसपास चर्चा होते, पण वास्तविक पाहता खऱ्या आयुष्यात त्याची किंमत नगण्य आहे.”

आणखी वाचा : “वामिकाला डेटवर घेऊन जाऊ का?” IPL मध्ये चिमुकल्याचा विराट कोहलीला प्रश्न; फलक पाहून कंगना रणौत संतापली, म्हणाली…

पुढे रफ्तार म्हणाला, “त्या कार्यक्रमात गेल्यावर काहीतरी आयुष्यात मिळवलं आहे असं बऱ्याच लोकांना वाटतं, भले त्यांच्या बँकेत एक पैसा नसेल पण कपिल शर्माच्या शोवर जाऊन आल्याचं ते गाजावाजा करत सांगतील.” रफ्तार हा सध्याच्या तरूणांचा आवडता आणि प्रचंड लोकप्रिय रॅपर आहे. मध्यंतरी त्याने बादशाह आणि इतर काही रॅपर्सबरोबर कपिल शर्माच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती आणि खूप धमालही केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Popular singer and rapper raftaar speaks about kapil sharma show says its fake avn