दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नकारात्मक भूमिकांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते कझान खान यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. १२ जून रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रॉडक्शन कंट्रोलर आणि प्रोड्यूसर एनएम बदुशा यांनी फेसबुकवर कझान खान यांच्या निधनाची माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आता फक्त आठवणीतच…”, शशांक केतकरचा वडिलोपार्जित वाडा पाडला जाणार; म्हणाला, “एका घराऐवजी…”

एनएम बदुशा यांनी फेसबुकवर कझान खान यांचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच पोस्टमध्ये कझान खान यांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्यांच्या निधनाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून कझान खान यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

कझान खान यांनी १९९२ मध्ये ‘सेंथामिझ पाट्टू’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. यानंतर त्यांनी ‘सेतुपती आयपीएस’, ‘कलाईगनन’, ‘मुराई मामन’ आणि ‘करुप्पा नीला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. कझान खान यांनी तमिळ आणि मल्याळम भाषेतील ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. ते खलनायक आणि नकारात्मक पात्रांसाठी जास्त ओळखले जातात.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Popular south actor kazan khan passed away due to heart attack hrc