एका अभिनेत्याने फेसबुक लाइव्हदरम्यान पत्नीबरोबर घटस्फोट घेणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे. प्रसिद्ध मल्याळम अभिनेता विनायकन पत्नीपासून विभक्त होत आहे. त्याने फेसबुक लाईव्हवर येऊन त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित माहिती दिली. त्यानंतर या दोघांच्या घटस्फोटाच्या कारणांबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तीनदा करोना, कॅन्सरशीही झुंज; मात्र घशाच्या संसर्गाने केला घात, प्रसिद्ध अभिनेते इनोसंट यांचं निधन

मल्याळम इंडस्ट्रीतील संगीतकार, गीतकार आणि अभिनेता विनायकन याने ‘थिमुरू’ आणि ‘मेरियन’ मध्ये देखील अभिनय केला आहे. लवकरच तो ‘जेलर’ चित्रपटात रजनीकांत यांच्याबरोबर काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचं शूटिंगही सुरू आहे. अशातच त्याच्या घटस्फोटाबद्दल बातमी आहे. आहे. विनायकन ‘मी टू’चे आरोप झाल्यानंतर चर्चेत आला होता. महिलांना सेक्ससाठी विचारणे ‘मी टू’ असेल तर आपण ते करत राहणार, असं त्याने म्हटलं होतं.

दरम्यान, विनायकनने अचानक फेसबुक लाईव्हदरम्यान पत्नीपासून घटस्फोटाची घोषणा केली आहे. तो म्हणाला, “मी विनायकन, मल्याळम अभिनेता आहे. माझ्या पत्नीबद्दल माझ्या कायदेशीर आणि वैवाहिक जबाबदाऱ्या आता पूर्ण झाल्या आहेत. तुम्हा सर्वांचे आभार.”

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीचं निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह

विनायकनच्या लग्नाला काही वर्षे झाली आहेत. याआधी त्याने आपले वैयक्तिक आयुष्य नेहमीच खासगी ठेवले होते. त्याच्या कुटुंबाविषयी कोणतीही माहिती मीडियामध्ये कधीही शेअर केली नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, विनायकन आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. दोघांमध्ये काही गैरसमज झाले आहेत आणि आता दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.