छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता शोएब इब्राहिमच्या घरी सध्या तणावाचे वातावरण आहे. त्याच्या वडिलांना ब्रेन स्ट्रोक आल्याने तातडीने रुग्णालयात हलविण्यात आल्याचे शोएअबने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून सांगितले आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंच्या माध्यमातून फॅन्सना वडिलांसाठी प्रार्थना करायला सांगितली असून ते सध्या आयसीयूमध्ये असल्याचे त्याने सांगितले आहे.
शोएबने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले की, “पुन्हा एकदा तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. वडिलांना सकाळी ब्रेन स्ट्रोक आला होता आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कृपया तुम्ही प्रार्थना करा की ते लवकर बरे होतील.”याआधी फेब्रुवारीमध्ये सुद्धा शोएबच्या वडिलांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळेस त्याने वडिलांसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोसोबतच त्याने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले होते. तो म्हणाला होता की, “सगळ्यांचे आभार, माझ्या वडिलांची आज सर्जरी झाली, आता त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. देवाच्या कृपेने काही दिवसांतच ते चालायला सुरुवात करतील.”
काही दिवसांपूर्वी शोएब इन्स्टाग्रामवर लाइव्ह आला होता. त्यावेळेस त्याने त्याच्या संघर्ष काळाबद्दल सांगताना तो म्हणाला, “वडिलांच्या विरोधात असताना त्याने या क्षेत्रात पदार्पण केले. मला माहित होतं की मी ज्या ऑडिशनला जातं आहे, त्या नकली आहेत. पण माझा सराव होईल म्हणून मी त्या ऑडिशन देत होतो.
View this post on Instagram
शोएब इब्राहिमने ‘रहना हैं तेरी पलकों के छाओं में’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून तो घराघरात पोहचला. शोएबने २०१८ साली ‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेत्री दीपिका कक्कडशी लग्न केलं.