अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या आगामी ‘हड्डी’ चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच या ‘हड्डी’च्या निर्मात्यांनी या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित केला आहे. त्यात नवाजुद्दीन हा एका स्त्रीच्या वेषात दिसत आहे. ते पोस्टर पाहून तो नवाजुद्दीन आहे हे ओळखणेही फार कठीण होते. आता अलीकडेच, नवाजुद्दीन या चित्रपटात तो साकारत असलेल्या स्त्री व्यक्तिरेखेबद्दल बोलला आहे. स्त्री भूमिका साकारणं सर्वात कठीण असतं असं त्याचं म्हणणं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : अक्षय कुमारचा ‘कठपुतली’ चित्रपट १८० कोटींना विकला गेला ? ‘डिस्नी प्लस हॉटस्टार’शी झाला व्यवहार

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान नवाज म्हणाला, “जर मी एखाद्या महिलेची भूमिका साकारत असेन, तर त्यासाठी मला एका महिलेसारखा विचार करावा लागेल. कपडे, हेअरस्टाइल आणि मेकअप या सर्व गोष्टींसाठी एक्सपर्ट दिले जातात, पण त्या पात्रात प्रवेश करणे ही एक अंतर्गत प्रक्रिया आहे. एका स्त्रीची भूमिका करण्यासाठी तुम्हाला स्त्रीच्या दृष्टिकोनातून विचार करावा लागतो, जो या भूमिकेसाठी मी केला. या संपूर्ण प्रक्रियेतून जाणं हिच माझ्यासाठी ‘हड्डी’ चित्रपटातील सर्वात आव्हानात्मक आणि कठीण बाजू होती.”

पुढे नवाजुद्दीन म्हणाला, ‘शूटिंगच्या दिवसांमध्ये महिलेची वेशभूषा आणि तिच्यासारखा लूक करणं यासाठी मला काही तास लागायचे. हे सगळं केल्यावर आता समजले आहे की महिला व्हॅनिटी व्हॅनमध्ये इतका वेळ का घालवतात. बऱ्याच गोष्टींसाठी वेळ काढणं अपरिहार्य असतं. परंतु आता ही भूमिका सकारल्यावर आता माझ्यात एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

हेही वाचा : नवाजुद्दीन सिद्दीकीच्या लुकशी होणाऱ्या तुलनेवर अर्चना पुरण सिंग यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

या चित्रपटात नवाजुद्दीन स्त्री आणि ट्रान्सजेंडर अशा दोन्ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात त्याची दुहेरी भूमिका आहे. जवळपास 4 वर्षांपासून नवाजुद्दीन या चित्रपटावर काम करत होता. हा चित्रपट पुढच्या वर्षी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Portray a female role is the most challenging thing said nawazuddin siddiqui rnv