दिग्दर्शक अभिषेक कपूर भारतीय पौराणिकातील महाकाव्य असलेले ‘महाभारत’ रुपेरी पडद्यावर आणणार आहे.
“‘महाभारत’ हे सार्वत्रिक सत्य व्यक्त करते. यातून मला अध्यात्म आणि मानवतेची व्याख्या समजली आहे. या महाकाव्याला मोठ्या पडद्यावर आणणे हे माझे ध्येय असून जगाला मला एक उत्कृष्ट चित्रपट द्यायचा आहे,” असे अभिषेक कपूर म्हणाला. या उल्लेखनीय कथेची जादू पुननिर्मित करण्यासाठी डिस्नी इंडियाने त्यांच्या योजना जाहीर केल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर करणार असून अशोक बंकर याची पटकथा लिहणार आहेत.
अभिषेक सध्या आगामी ‘फितूर’ चित्रपटात व्यस्त आहे. मात्र, त्याचे काम पूर्ण होताच तो महाभारताच्या दिग्दर्शनास सुरुवात करणार आहे.
आणखी वाचा