‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेने मालिकेच्या शेवटच्या भागाचे नुकतेच चित्रीकरण पूर्ण केले. या मालिकेनंतर आपण दीर्घ सुट्टीवर जाणार असून कोणतेच काम हाती घेणार नसल्याचे अंकिताने म्हटले आहे.
भविष्यातील योंजनांबद्दल अंकिताला विचारले असता ती म्हणाली की, “पुढच्या वर्षीपर्यंत मी ब्रेकवर जात आहे. मला खरचं माहित नाही मी काय करणार, पण या मोकळ्या वेळाचा मला आनंद घ्यायचा आहे. त्यामुळे निश्चितचं पुढच्या वर्षीपर्यंत मी हातात कोणतेच काम घेणार नाही.” २००९ साली ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका सुरु झाली आणि अंकिता व तिचा प्रियकर सुशांत सिंह राजपूत यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून नावाजले गेले. पुढे ती म्हणाली की, “या मालिकेकरिता मी खूप बलिदान दिले आहेत. आम्ही दिवाळी, वाढदिवस आणि होळीच्या दरम्यानसुद्धा काम करायचो. पण, मला बालाजीसोबत काम करून खूप मजा आली. हे मला एका परिवारासारखे होते. मालिका संपत आहे हा एक दुःखद क्षण आहे.”
‘पवित्र रिश्ता’नंतर दीर्घ सुट्टीवर जाणार अंकिता लोखंडे
'पवित्र रिश्ता' या मालिकेने प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेने मालिकेच्या शेवटच्या भागाचे नुकतेच चित्रीकरण पूर्ण केले.

First published on: 13-10-2014 at 02:33 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Post pavitra rishta ankita plans a long break