‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेने मालिकेच्या शेवटच्या भागाचे नुकतेच चित्रीकरण पूर्ण केले. या मालिकेनंतर आपण दीर्घ सुट्टीवर जाणार असून कोणतेच काम हाती घेणार नसल्याचे अंकिताने म्हटले आहे.
भविष्यातील योंजनांबद्दल अंकिताला विचारले असता ती म्हणाली की, “पुढच्या वर्षीपर्यंत मी ब्रेकवर जात आहे. मला खरचं माहित नाही मी काय करणार, पण या मोकळ्या वेळाचा मला आनंद घ्यायचा आहे. त्यामुळे निश्चितचं पुढच्या वर्षीपर्यंत मी हातात कोणतेच काम घेणार नाही.” २००९ साली ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका सुरु झाली आणि अंकिता व तिचा प्रियकर सुशांत सिंह राजपूत यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून नावाजले गेले. पुढे ती म्हणाली की, “या मालिकेकरिता मी खूप बलिदान दिले आहेत. आम्ही दिवाळी, वाढदिवस आणि होळीच्या दरम्यानसुद्धा काम करायचो. पण, मला बालाजीसोबत काम करून खूप मजा आली. हे मला एका परिवारासारखे होते. मालिका संपत आहे हा एक दुःखद क्षण आहे.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा