‘पॉवर रेंजर’ फेम अमेरिकन अभिनेता जेसन डेव्हिड फ्रॅंक यांचं निधन झालं आहे. तो ४९ वर्षांचा होता. ९०च्या दशकातील ‘मायटी मॉर्फिन पॉवर रेंजर’ या सीरिजमधून त्याला प्रसिद्धी मिळाली होती.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेसन डेव्हिड फ्रॅंक याची मॅनेजर जस्टिन हन्ट हिने रविवारी (२० नोव्हेंबर) याबाबतची माहिती दिली. परंतु त्याच्या निधनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. याबाबत त्याच्या कुटुंबियांकडून कोणत्याही प्रकारची माहिती दिली गेलेली नाही. “जेसन फ्रॅंक या अत्यंत चांगल्या व जवळच्या व्यक्तीला गमावल्यानंतर त्याचे कुटुंबीय व मित्रपरिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे त्यांना एकांत व थोडा वेळ द्यावा”, असं जस्टिन हन्ट म्हणाली.

हेही वाचा >> “निधनानंतर दोन दिवस…” तबस्सूम यांच्या शेवटच्या इच्छेबाबत मुलाचा खुलासा

९०च्या दशकातील ‘मायटी मॉर्फिन पॉवर रेंजर’ ही लहान मुलांकरिता सुरू करण्यात आलेली टीव्ही सीरिज अत्यंत लोकप्रिय होती. या सीरिजमध्ये पाच तरुणांची पृथ्वीला दृष्ट लोकांपासून वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची गोष्ट दाखविण्यात आली होती. १९९३ साली प्रसारित झालेल्या या सीरिजमध्ये सुरुवातीला जेसन डेव्हिड फ्रॅंक याने खलनायिकाची भूमिका साकारली होती. परंतु, नंतर पाच पॉवर रेंजरपैकी हिरव्या पॉवर रेंजरच्या भूमिकेत तो दिसला.

पॉवर रेंजर’ सीरिजमध्ये काळ्या पावर रेंजरची भूमिका साकारलेल्या वॉल्टर जोन्सने जेसन डेव्हिडच्या निधनाची बातमी कळताच शोक व्यक्त केला आहे. “पॉवर रेंजर कुटुंबातील आणखी एका व्यक्तीला गमावल्याचं दु:ख होत आहे”, असं त्याने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power ranger fame american actor jason david frank dies at 49 kak