‘बाहुबली’च्या घवघवीत यशानंतर प्रेक्षकांना प्रभासला पुन्हा तशा मोठ्या आणि भव्य अशा भूमिकेत बघायची इच्छा आहे, मध्यंतरी आलेल्या ‘राधे श्याम’ने प्रेक्षकांची निराशा केली. आता मात्र प्रेक्षक त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज असून लवकरच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार आहे.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर अयोध्यामध्ये प्रदर्शित होणार असल्याची चर्चा होत होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. २ ऑक्टोबरला खुद्द प्रभासच्या हस्ते या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात येणार आहे आणि त्यासाठी चित्रपटाची टीम अयोध्यामध्ये असल्याची बातमी समोर आली आहे. बॉलिवूड हंगामाच्या माहितीनुसार ज्या शहरात प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला त्याच ठिकाणी हा टीझर प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा : जेव्हा राम गोपाल वर्मा फोनवर म्हणाले “टायगर श्रॉफ एक स्त्री आहे” आणि विद्युत जामवालने ते रेकॉर्डिंग लीक केलं

मीडिया क्षेत्रातील बरीच मंडळी अयोध्याकडे रवाना झाली असून त्यासाठी सगळेच सज्ज आहेत. याविषयी आणखीन खुलासा करताना चित्रपटाच्या टीमने सांगितलं की “टीझर हा प्रभासच्या हस्ते प्रदर्शित होणार आहे पण त्याबरोबर आणखीन कोणते कलाकार उपस्थित असतील हे सांगता येणं कठीण आहे. आम्हाला आमच्या चित्रपटावर पूर्ण विश्वास आहे.” याबरोबरच लव-कुश रामलीला समितिची प्रमुख अर्जुन कुमार यांनी हे स्पष्ट केलं आहे की ५ ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये रावण दहनाच्या कार्यक्रमातही प्रभास सहभागी होणार आहे.

दिग्दर्शक ओम राऊत यांच्या ‘तान्हाजी’ नंतर हा दूसरा मोठा बॉलिवूड चित्रपट आहे. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटात प्रभासबरोबरच क्रिती सनोन, सैफ अली खान, वत्सल शेठ हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पुढच्या वर्षी १२ जानेवारीला हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader