Salaar trailer: साऊथचा रेबेल सुपरस्टार प्रभासच्या आगामी ‘सालार’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. चाहते खूप दिवसांपासून ‘सालार’च्या ट्रेलरची वाट पाहत होते. १ डिसेंबरला म्हणजेच शुक्रवारी या बहुचर्चित ‘सालार’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहून असे म्हणता येईल की या चित्रपटातून अॅक्शन आणि थ्रिलरची मेजवानीच प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ‘सालार’च्या ३ मिनिटे ४७ सेकंदांच्या ट्रेलरमधील प्रभासची दमदार अ‍ॅक्शन सर्वांची मनं जिंकली आहेत.

गेले काही चित्रपट सलग बॉक्स ऑफीसवर आपटत असल्याने प्रभासचा ‘केजीएफ’फेम दिग्दर्शन प्रशांत नीलबरोबरच्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. ही गोष्ट दोन मित्रांच्या घनिष्ट मैत्रीची अन् खानसारमधील सत्तेच्या गादीसाठी होणाऱ्या संघर्षाची आहे हे या ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पृथ्वीराज सुकुमारनचाही चांगलाच मोठा आणि महत्त्वाचा रोल असणार हे स्पष्ट होत आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आणखी वाचा : ‘अ‍ॅनिमल’नंतर आता त्याच्या सीक्वलची चर्चा; चित्रपटातील ‘तो’ सीन पाहून प्रेक्षक ‘अ‍ॅनिमल पार्क’साठी उत्सुक

पृथ्वीराजच्या लुकने, प्रभासच्या अॅक्शनने, बॅकग्राऊंड स्कोअरने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याबरोबरच नुकतंच प्रशांत नील यांनी ‘सालार’ आणि ‘केजीएफ’मध्ये कोणताही संबंध नसल्याचंही स्पष्ट केलं आहे, त्यामुळे हा एक स्वतंत्र वेगळाच चित्रपट असणार आहे. काहींनी या ट्रेलरचं कौतुक केलं आहे तर काहींनी याला ‘केजीएफ’ची कॉपी म्हणून नाकारलं आहे. ‘केजीएफ’प्रमाणेच एक वेगळं विश्व उभं करण्यात प्रशांत नील हे यशस्वी झाल्याचं ट्रेलरमधून स्पष्ट होत आहे.

होम्बल फिल्म्स निर्मित, ‘सालार: पार्ट १ सीझफायर’ हा चित्रपट प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केला आहे आणि यात प्रभास, श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू हे मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या २२ डिसेंबरला प्रदर्शित होणार असून याच चित्रपटाबरोबर शाहरुख खानचा बहुचर्चित ‘डंकी’देखील प्रदर्शित होणार आहे त्यामुळे बॉक्स ऑफिसवर एक वेगळीच स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळणार.

Story img Loader