‘बाहुबली २’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रभासने एक महिन्याचा मोठा ब्रेक घेण्याचे ठरवले होते. यासाठी त्याने थेट अमेरिका गाठली होती. अमेरिकेत नक्की कुठे प्रभास सुट्ट्यांचा आनंद घेत आहे याचा थांगपत्ताही त्याने शेवटपर्यंत लागू दिला नाही. एक महिन्याच्या सुट्ट्यांचा मनमुराद आनंद घेऊन अखेर तो भारतात परतला आहे. जुलै महिन्यात तो त्याचा आगामी सिनेमा ‘साहो’च्या चित्रीकरणाला सुरूवात करणार.

अरुंधती रॉयला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तर ते मलाही आहे- परेश रावल

New Fear Unlocked Viral Video Shows Cobra Coming Out Of Toilet Commode
टॉयलेटच्या कमोडमध्ये लपला होता भला मोठा कोब्रा; सर्पमित्राने पकडला अत्यंत विषारी साप, Viral Video पाहून उडेल थरकाप
lazy leopard seeing the dog the leopard didn't wake up
क्या बिबट्या बनेगा रे तू! कुत्र्याला पाहूनही बिबट्या जागचा हलेना, आळशी बिबट्याचा VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “हा जरा मंद…”
Adding Muslim votes to the Jarange factor Shiv Senas stronghold in Parbhani is impregnable
‘जरांगे फॅक्टर’ला मुस्लिम मतांची जोड, परभणीत शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य
young boy in pune enjoys Rain
“पुणेकरांचा नादखुळा!” पावसाचा आनंद लुटणाऱ्या पुणेरी तरुणाचा व्हिडीओ बघाच, पोटधरुन हसाल
Man touched a woman in a crowded DTC bus
गर्दीचा फायदा घेत बसमध्ये महिलेला नको त्या जागी स्पर्श; महिलेने इशारा दिल्यानंतरही त्याने…तरुणाचा संतापजनक VIDEO व्हायरल
accident in Rajgarh district
मध्य प्रदेशमध्ये ट्रॅक्टर ट्रोलीचा भीषण अपघात; १३ जणांचा मृत्यू, १५ लोक जखमी
what are volcanoes
बर्फाळ प्रदेशातल्या आईसलँडमध्ये ज्वालामुखीचा भीषण उद्रेक कसा झाला? ज्वालामुखीची निर्मिती कशी होते? जाणून घ्या…
Leopard Attack in Coinbatore
रात्रीच्या अंधारात दोन डोळे चमकले, बिबट्यानं थेट भिंतीवर झेप घेतली अन्…, Video व्हायरल!

सध्या त्याचा भारतात परतल्या नंतरचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो बराच बारीक झालेला दिसतोय. सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट अलीम हाकीम याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रभाससोबतचा एक फोटो शेअर केला आहे. प्रभासने अलीमकडून एक खास हेअर स्टाइल करून घेतली आहे. प्रभास, अमरेंद्र बाहुबलीसारखा भारदस्त जरी दिसत नसला तरी तो आजही अनेक तरुणींच्या गळ्यातला ताईत आहे.

३७ वर्षीय प्रभासच्या ‘साहो’ या आगामी सिनेमाचा टीझर बाहुबली सिनेमादरम्यान दाखवण्यात आला होता. सुजीथ दिग्दर्शित सिनेमाचा टीझर बघून या सिनेमात जबरदस्त अ‍ॅक्शन असल्याचे दिसून येते. हिंदी, तामीळ आणि तेलगू या तीन भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. निर्मात्यांनी या सिनेमातील अ‍ॅक्शन सीनवर प्रचंड खर्च केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रभासच्या या सिनेमाकडे सगळ्यांच्याच नजरा असून, प्रभासचा करिष्मा या सिनेमात पुन्हा एकदा पाहायला मिळणार की नाही याची त्याच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे.