दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन आगामी ‘आदिपुरूष’ चित्रपटांमध्ये एकत्र दिसणार आहेत. चित्रपटाचं शूटिंग सुरू असून हा चित्रपट २०२३मध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, प्रभास आणि क्रितीचा हा पहिला चित्रपट आहे. शूटिंगवेळी दोघांचंही चांगलं बाँडिंग पाहायला मिळत आहे. अशातच प्रभास आणि क्रिती एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रिती काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘भेडिया’ चित्रपटात वरुण धवनबरोबर दिसली होती. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, वरुणने क्रितीची मस्करी करताना दोघांच्या अफेअरचा इशारा दिला होता. पण, नंतर मात्र त्याने त्यात काहीही तथ्य नसल्याचं म्हटलं होतं. क्रिती आणि प्रभासच्या डेटिंगच्या चर्चा लग्नापर्यंत पोहोचल्यानंतर खुद्द अभिनेत्रीने याबद्दल मौन सोडत या निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं होतं. पण यावर लोकांचा मात्र विश्वास बसलेला दिसत नाहीये. कारण, हाच प्रश्न आता प्रभासला विचारण्यात आला आहे.

प्रभासच्या लव्ह लाईफबद्दल अखेर अभिनेता रामचरणने केला खुलासा; व्हिडीओ व्हायरल

प्रभास ‘अनस्टॉपेबल विथ एनबीके 2′ मध्ये दिसला होता. यावेळी त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही भाष्य केलं. क्रिती सेनॉनबरोबरच्या अफेअरबद्दल विचारलं असता ‘जुन्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही’ असं तो म्हणाला. “ही जुनी बातमी आहे सर. ‘मॅडम’ कडून स्पष्टीकरण देखील देण्यात आलं होतं की असं काहीही नाही, ” असं प्रभासने सांगितलं.

दरम्यान, पौराणिक कथा रामायणावर आधारित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार होता. पण टीजरवर टीका झाल्यानंतर त्याचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं. या चित्रपट प्रभास, क्रिती सेनॉनसह सैफ अली खान आणि सनी सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prabhas on dating rumours with kriti sanon calls her madam hrc