दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. मध्यंतरी प्रभासच्या लग्नाबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. आता पुन्हा एकदा तो लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. लग्नासाठी प्रभास तयार आहे आणि लवकरच तो लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. त्याचे चाहते देखील प्रभास आनंदाची बातमी कधी येणार याची वाट पाहत आहेत.
आणखी वाचा – ‘सम्राट पृथ्वीराज’च्या अपयशानंतरही अक्षयची गाडी सुसाट, निर्मात्याचं मात्र १०० कोटींपेक्षा अधिक नुकसान
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, प्रभासचे काका कृष्णम राजू लवकरच प्रभासच्या लग्नाची घोषणा करु शकतात. तसेच सोशल मीडियावर प्रभासच्या लग्नासंदर्भातील एक जूना व्हिडीओ व्हायरल देखील होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रभासच्या लग्नाबाबत चर्चा होताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते देखील खूश झाले आहेत. लग्नासाठी प्रभासने मुलगी देखील पसंत केली असल्याचं बोललं जात आहे.
प्रभासचं याआधी काही अभिनेत्रींशी नाव जोडलं गेलं. त्याच्या रिलेशनशिपच्या बऱ्याच चर्चा देखील रंगल्या. पण प्रभासने मात्र या सगळ्या चर्चांकडे दुर्लक्ष केलं. प्रभासने तो लग्न करत असल्याच्या चर्चांवर अद्यापही मौन सोडलं नाही. तसेच त्याने स्वतः याबाबत कोणतीच अधिकृत घोषणा केली नाही. प्रभासचं वय आता ४२ वर्ष आहे. त्यामुळे प्रभास नक्की लग्न कधी करणार? असे प्रश्न चाहते नेहमीच विचारताना दिसतात.
आणखी वाचा – “महाराष्ट्रात आत्ताच पळून यावं वाटतं कारण…”, हिमाचल प्रदेशमध्ये गेलेली प्राजक्ता माळी असं का म्हणाली?
सध्या प्रभास दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. ‘सालार’ असं या चित्रपटाचं नाव आहे. ‘केजीएफ’ चित्रपटासारखाच हा चित्रपटही भव्यदिव्य असणार असल्याचं बोललं जात आहे. शिवाय प्रभास अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण यांच्याबरोबरही येत्या काळात काम करताना दिसेल.