हॉलिवूड स्टार अल पचीनो आणि रॉबर्ट डी नीरो हे ८० व्या वर्षीही चौथ्या किंवा सातव्या मुलाला जन्म देत असल्याच्या बातम्या आपण काही दिवसांपासून ऐकत आहोत. एकूणच सोशल मीडियावर याची जबरदस्त चर्चा होताना दिसत आहे. अशातच आपले भारतीय सेलिब्रिटीज तरी कसे मागे राहणार? नृत्यदिग्दर्शक आणि दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक प्रभू देवा सध्या याच कारणामुळे चर्चेत आहे.

५० व्या वर्षी प्रभू देवाला वडील होण्याचं सौभाग्य मिळालं आहे. दुसरी पत्नी हिमानी सिंगपासून प्रभू देवाला पहिलं कन्या रत्न झालं आहे. २०२० मध्ये प्रभू देवाने हिमानीसह लग्नगाठ बांधली होती. या नव्या तान्ह्या बाळासाठी दोघेही चांगलेच उत्सुक होते.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Somnath Suryawanshi Mother
Somnath Suryawanshi Mother : राहुल गांधींच्या भेटीनंतर सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा साश्रू नयनांनी दावा, “माझ्या मुलाला मारहाण करुन त्याचे…”
mudassar khan riya kishanchandani welcome baby girl
Video: वर्षभरापूर्वी केलं आंतरधर्मीय लग्न, सलमान खानचा जवळचा मित्र झाला बाबा; पत्नीने मुलीला दिला जन्म
saleel kulkarni shared special post for daughter Ananya on her birthday
“प्रत्येक जन्मी मला तुझा बाबा होऊ दे”, सलील कुलकर्णींची लेकीसाठी सुंदर पोस्ट, म्हणाले, “माझ्या जीवाची सावली…”
Bollywood actress Radhika Apte did not want to become a mother confesses after she gave birth to a daughter
“आम्हाला मूल नको होतं; पण…”, बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने केला मोठा खुलासा! सांगितला मातृत्वाचा कमी बोलला जाणारा पैलू
Radhika Apte confesses she and husband never wanted kids
“आम्हाला बाळ नको होतं”, मुलीच्या जन्मानंतर राधिका आपटेचं वक्तव्य; म्हणाली, “मी गरोदर आहे हे कळाल्यावर…”

आणखी वाचा : अल पचिनो यांची २९ वर्षीय गरोदर गर्लफ्रेण्डकडे पितृत्व चाचणीची मागणी; अभिनेत्याचे कुटुंबीयही प्रचंड नाराज

खुद्द प्रभू देवाने या गोष्टीची पुष्टी केली आहे. ‘ईटाइम्स’शी संवाद साधताना प्रभू देवा म्हणाला, “हो या वयातही मी बाप झालो आहे हे खरं आहे. मी फार आनंदी आहे आणि परिपूर्ण झालोय असं वाटतंय.” प्रभू देवाला पहिली पत्नी रामलतापासून तीन मुलं आहेत. अद्याप यावर आणखी कुणी प्रतिक्रिया दिलेली नाही.

प्रभू देवाने पुढील सगळा वेळ हा लहान मुलीबरोबर घालवणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. एकंदरच कामाचा व्याप कमी करून कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यासाठी प्रभू देवा उत्सुक आहे. पहिल्या पत्नीबरोबर १६ वर्षं संसार केल्यानंतर प्रभू देवाने वेगळं व्हायचा निर्णय घेतला. नयनताराबरोबर अफेअर असल्याने प्रभू देवाने घटस्फोट घेतल्याची तेव्हा चर्चा झाली होती, पण त्याबद्दल काहीच ठोस बातमी समोर आली नाही.

Story img Loader