कलाविश्वातील सर्वाधिक मानाच्या मानल्या जाणाऱ्या ९५व्या अकादमी अवॉर्डची घोषणा सोमवारी(१३ मार्च) करण्यात आली. यंदाचा ऑस्कर भारतासाठी खास ठरला. ‘द एलिफंट व्हिसपर्स’ या शॉर्ट फिल्मला ‘बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म’ या कॅटेगरीत अवॉर्ड मिळाला. याबरोबरच बहुचर्चित एस.एस.राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्यालाही ऑस्कर मिळाला.
‘बेस्ट ओरिजिनल साँग’ या श्रेणीत नाटू नाटूला ऑस्कर मिळाला आहे. पहिल्यांदाच भारताला एका गाण्याने ऑस्कर मिळवून दिला आहे. ‘नाटू नाटू’ला ऑस्कर मिळाल्यानंतर सर्वच स्तरातून यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ‘नाटू नाटू’ला ऑस्कर मिळाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आहे.
हेही वाचा>> “किरणजी, मी बारामतीहून सुनेत्रा पवार बोलतीये”, अजित पवारांच्या पत्नीने किरण मानेंना फोन केला अन्…
‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्कर मिळाल्यानंतर प्राची साध्वी यांनी ट्वीट करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे. “चित्रपटात राम व सीता नावाची पात्र असल्यानेच ‘आरआरआर’ला ऑस्कर मिळाला आहे. अभिनंदन भारत” असं ट्वीट त्यांनी केलं आहे. साध्वी प्राची यांचं ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. या ट्वीटनंतर साध्वी प्राची यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
हेही वाचा>> “पंजाबी गायक व कलाकारांकडून गँगस्टर पैसे घेतात का? ” लॉरेन्स बिश्नोई उत्तर देत म्हणाला, “बॉलिवूडप्रमाणे…”
“भाजपाचे नेते या चित्रपटाला विरोध करत होते, तेव्हा तुम्ही कुठे होतात?” अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “याचा अर्थ मोदींना अभिनयासाठी ऑस्कर कधीच मिळणार नाही. कारण, त्यांच्या नावात राम नाही”, असं म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने ट्रोल करत “डॉक्टरची पदवी कुठून घेतली आहे?” अशी कमेंट केली आहे.