“स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज” या मालिकेत महाराणी येसूबाई राणीसाहेबांची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षकांच्या मनात तिच्या अभिनयाच्या जोरावर घर केले आहे. ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आणि अजूनही प्रेक्षक या भूमिकेसाठी तिला दाद देताना दिसतात. आता प्राजक्ता प्रेक्षकांसमोर एका नव्या भूमिकेत आली आहे. तिचे एक नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

याआधी ऐतिहासिक भूमिकेत पहायला मिळणारी प्राजक्ता आता या गाण्यात वेगळ्या लूक मध्ये दिसतेय. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणजेच ६ ऑक्टोबरला या गाण्याचा टीझर लाँच करण्यात आला होता. आता हे गाणं प्रेक्षकांना युट्युब, मायबोली चॅनेलवर पाहायला मिळणार आहे. या गाण्याची निर्मिती निर्माते शिवाजी जवळे, संदीप कुंजीर, गजानन सानप, संदेश भोंडवे यांनी केली आहे.

प्राजक्ताच्या या गाण्याचे नाव “साजनी” असे आहे. या गाण्याबद्दल बोलताना प्राजक्ता म्हणाली की हे गाणं अतिशय सुंदर आहे. ऐकायला खरंच खूप छान आहे याचे म्युझिक बिट्स गाणे ऐकणाऱ्याला गुणगुणायला लावतात. आणि हे गाणं जर सकाळी ऐकलं तर खूप फ्रेश वाटेल कारण या गाण्याचे म्युझिक खूप प्लेजेंट आहे. प्राजक्ता सोबत या गाण्यात सिद्धांत तुपे दिसत आहे.

Story img Loader