‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाई ही भूमिका साकारली होती. तर आता ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यातही ती महाराणी येसूबाईंची भूमिका साकारताना दिसली. पण काही दिवसांपूर्वी तिने हे महानाट्य सोडलं. भरभरून प्रतिसाद मिळणारं नाटक प्राजक्ताने सोडल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण आता याचं कारण समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राजक्ताचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय राहून विविध पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. काही महिन्यांपूर्वी ती ‘शिवपुत्र संभाजी’ या नाटकामध्ये येसूबाईंची भूमिका साकारणार असल्याचं तिने सांगितलं होतं. तर वेळोवेळी ती या नाटकाच्या प्रयोगांविषयी, प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमाविषयीच्या गोष्टी चाहत्यांशी शेअर करत होती. पण काही दिवसांपूर्वी अचानक प्राजक्ताच्या ऐवजी आता या महानाट्यात येसूबाईंच्या भूमिकेत स्नेहलता वसईकर दिसणार असल्याचं समोर आलं. याचबरोबर या भूमिकेच्या वेशभूषेतील तिचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले. ते फोटो पाहून प्राजक्ताने हे नाटक का सोडलं, असा प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण झाला होता.

आणखी वाचा : प्राजक्ता गायकवाडने केला तिच्या नव्या घरात गृहप्रवेश, पाहा खास झलक

तर आता प्राजक्ताने स्वतः एक पोस्ट शेअर करत याचं उत्तर दिलं आहे. प्राजक्ताने हे महानाट्य सोडण्याचे कारण म्हणजे तिचा आगामी चित्रपट. प्राजक्ता लवकरच एका नव्या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच हैदराबादमध्ये सुरुवात झाली. तिने या शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये या चित्रपटाची टीम गणपतीची पूजा करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने लिहिलं, “बाप्पा मोरया…” याचबरोबर तिने न्यू मूव्ही, न्यू स्टार्ट, हैदराबाद, साऊथ इंडियन, इंडिया, मराठी मुलगी हे हॅशटॅगही दिले.

हेही वाचा : “ती गोष्ट करायला आवडत नाही पण…” प्राजक्ता गायकवाडची ‘ती’ पोस्ट चर्चेत

आता प्राजक्ताची ही पोस्ट पाहून या चित्रपटासाठी प्राजक्ताने ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यातून एक्झिट घेतली आहे असं समोर येतं. तर त्यामुळे आता प्राजक्ता या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्यावर पुन्हा या महानाट्यात काम करणार का? याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. आता या पोस्टवर तिचे चाहते कमेंट्स करत, तिचं अभिनंदन करत तिला या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prajakta gaikwad revealed why she takes exit from shivputra sambhaji drama rnv