छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच प्राजक्ताने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. प्राजक्ताने या फोटोमध्ये प्रिंटेड ड्रेस परिधान केला आहे. या फोटोमध्ये प्राजक्ताचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. प्राजक्ताने हे फोटो शेअर करत “बाबूजी धीरे चलना…प्यार में ज़रा…”, असे कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “आई कुठे काय करतेचे एक सुंदर जग…”, मिलिंद गवळीने शेअर केली भावनिक पोस्ट चर्चेत
आणखी वाचा : करिश्मा कपूर पुन्हा होणार नवरी? ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधान

आणखी वाचा : बॉलिवूड अभिनेत्रींचे स्टायलिश मंगळसूत्र पाहिलेत का?
प्राजक्ताचे हे फोटो नेटकऱ्यांना प्रचंड आवडले आहेत. प्राजक्ताची स्तुती करत एक नेटकरी म्हणाला, “प्राजुजी धीरे चलना… आपके प्यार में गिरने से संभालना.” दुसरा नेटकरी म्हणाला, “चालायचं संबंधच येत नाही मी तुझ्या प्रेमात पडलोय.” तिसरा नेटकरी म्हणाला, “वॉलपेपरसाठी नवीन फोटो पाठवल्याबद्दल, धन्यवाद मॅम.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “हळूच जातोय कार विकून सायकल घेतली, आणखी किती हळू चालू.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “वजन थोडसं वाढलयं अस मला वाटतं, बाकी लय भारी.” दुसरा नेटकरी म्हणाला, “जाड झालीस पण तरी पण सुंदर आहेस.”