मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. प्राजक्ता ही ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून घराघरात पोहोचली. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. सध्या प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून ती रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. त्यासोबत ती लवकरच वाय चित्रपटात झळकणार आहे. नुकतंच तिचे एका मुलाखतीत प्राजक्ता माळीने तिच्या कलाकृती हिट होण्यामागचे कारण सांगितले आहे.
प्राजक्ता माळी ही वाय चित्रपटाच्या अनोख्या टिझर आणि ट्रेलरमुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने केलेलं एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे. ‘प्राजक्ता ज्या ज्या कलाकृतीत असते ती कलाकृती हिट होते.’ त्यावर तिने असं स्पष्टीकरण दिलं की, “असं नाही मला आधीच माहित असतं की ही कलाकृती हिट होणार आहे. म्हणूनच मी त्या प्रोजेक्टला होकार देते. चंद्रमुखीची संहिता ऐकवल्यावरच मला कळलं होतं की हा एक यशस्वी व्यावसायिक चित्रपट आहे.”
प्राजक्ता माळीने शेअर केला मुक्ता बर्वेसोबत काम करण्याचा अनुभव, म्हणाली “तुझ्याबरोबर…”
“पावनखिंडीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची यशोगाथा पोहोचणार म्हणजे तो सुद्धा नक्कीच यशस्वी होईल. तसेच पांडू चित्रपटाबद्दलही मला खात्री होती की हा चित्रपट व्यावसायिक पातळीवर यशस्वी होईल, म्हणूनच मी त्या चित्रपटांचा भाग झाले”, असेही ती म्हणाली. यावेळी प्राजक्ताने हसतहसत हे स्पष्टीकरण प्रसारमाध्यमांना दिल्याचे समोर येत आहे.
“माझा पाठिंबा आहे…”, अभिनेत्री प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत
प्राजक्ता ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. सध्या ती कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित वाय या चित्रपटात झळकत आहे. या चित्रपटाची कथा अजित सुर्यकांत वाडीकर यांची आहे. तर या चित्रपटाची पटकथा आणि संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ आणि संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत. तर कार्यकारी निर्मात्याची धुरा विराज विनय मुनोत यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.