अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. आपला दिनक्रम, चित्रपट, कुटुंबाबाबत ती सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसते. चाहत्यांनी संवाद साधण्याचा हा तिचा अनोखा फंडा आहे. प्राजक्ता सुत्रसंचालन करत असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने काही काळासाठी ब्रेक घेतला होता. आता पुन्हा हा कार्यक्रम नव्या जोमाने सुरु झाला आहे. पण आता प्राजक्ता परदेश दौरा करणार असल्याचं समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – महादेवाचं दर्शन घेण्यासाठी परळी वैजनाथला पोहोचली प्राजक्ता माळी, म्हणाली, “माझ्या पायाला भवरा बांधला आहे आणि…”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या चित्रीकरणामधून मिळालेल्या वेळेमध्ये प्राजक्ता देवदर्शन करत होती. त्यादरम्यानचे काही फोटो देखील तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले होते. इतकंच नव्हे तर तिने गणेशोत्सवादरम्यान लालबागच्या राजाचंही दर्शन घेतलं. आता आपण लंडनला निघालो असल्याचं तिने एक फोटो शेअर करत म्हटलं आहे.

याआधी प्राजक्ता सोलो ट्रिप किंवा कुटुंबाबरोबर बऱ्याच ठिकाणी गेली. आता ती एका अभिनेत्याबरोबर लंडनला जात आहे. हा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. संकर्षणबरोबर सेल्फी शेअर करत तिने म्हटलं की, “माझ्या मित्रासह लंडनला जाण्यासाठी तयार.” या फोटोमध्ये संकर्षणसह प्राजक्ता फारच खूश दिसत आहे.

आणखी वाचा – “काय झाडी, काय डोंगार, काय प्राजक्ता…”; प्राजक्ता माळीच्या पावसाळी ट्रिपची चर्चा, नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट

पण काही कामानिमित्त हे दोघं लंडनला जात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. म्हणजेच काही दिवस बहुदा प्राजक्ता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये दिसणार नसल्याची चर्चा आहे. प्राजक्ता सध्या मराठी चित्रपटांमध्येही उत्तमोत्तम भूमिका साकारताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा ‘वाय’ चित्रपट प्रदर्शित झाला. आता लंडनला ती नक्की कोणत्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेली आहे? हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prajakta mali london trip with actor sankarshan karhade photo goes viral on social media kmd