मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या प्राजक्ता ही तिच्या रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. महाराष्ट्रातील आजकालच्या राजकारण पाहता प्राजक्ताने रानबाजार या सीरिजमधील एका प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आणखी वाचा : …म्हणून ‘धर्मवीर’ चित्रपटातील शेवटचा ‘तो’ सीन होतोय व्हायरल
प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून रानबाजार या सीरिजमधील तो एक प्रसंग शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला मकरंद अनासपुरे यांच्या डायलॉगने होते. ते म्हणतायंत की, “सामान्य माणसांचा आता राजकारण्यांवर विश्वास राहिलेला नाही. खोटी आश्वासनं, अभद्र युत्या याची लोकांना सवय झाली आहे. पक्षनिष्ठा, पक्षाची तत्त्व या सगळ्या पुस्तकी गोष्टी झाल्या आहेत. पक्षाच्या झेंड्याचा रंग कोणताही असला तरी सत्तेचा रंग महत्त्वाचा.”
आणखी वाचा : “आणखी कोणाला असं वाटतंय…”, जिनिलियाने शेअर केलेला ‘हा’ मजेशीर व्हिडीओ पाहिलात का?

आणखी वाचा : रूट कॅनल करणे अभिनेत्रीला पडले महागात!

आणखी वाचा : सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती घेणार घटस्फोट?
पुढे व्हिडीओमध्ये एका वृत्तनिवेदिकेचा आवाज येतो. त्यांचे शब्द असे आहेत की, “महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ. युसूफ पटेल आणि निशा जैन यांच्यासह ४२ आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे महाराष्ट्रात अवघ्या दीड दिवसात सरकार कोसळलं. महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ’, ‘सरकार संकटात’, ‘मोठा रानबाजार सुरू आहे”, अशी काही वाक्य देखील तिने या व्हिडिओद्वारे शेअर केली आहेत.
दरम्यान, अभिनेत्री तेजस्विनी पंडितने देखील हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत “रान बाजार”, काय मग बघताय ना?