मराठी सिनेसृष्टीमधील सतत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताने छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरला सुरुवात केली आणि आज तिने कलाक्षेत्रात स्वतःचं एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर प्राजक्ता सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्राजक्ता सध्या रानबाजार या तिच्या सीरिजमुळे चर्चेत आहे. या भूमिकेसाठी प्राजक्ताने कशी तयारी केली याचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : प्रेक्षक बोंबा मारायला लागले म्हणून भरत जाधवने थांबवलं नाटक; महापौरांना केला कॉल अन्…

प्राजक्ताने या सीरिजसाठी अगदी शरीरापासून अभिनयापर्यंत अनेक गोष्टींवर काम केलं आहे. रत्ना या भूमिकेसाठी प्राजक्ताने तब्ब्ल सात ते आठ किलो वजन वाढवलं होतं. या भूमिकेसाठी तिच्या बोलण्याची आणि चालण्याच्या पद्धतीपासून सगळ्याच गोष्टी शिकाव्या लागल्या. रत्ना या भूमिकेसाठी तिने मसाला गुटखा खायची तालीम सुद्धा तिने घेतली. त्याचा एक व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत प्राजक्ता मसाला गुटखा खाण्याची प्रॅक्टिस करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत “व्हॅनिटीमध्ये बसून बडीशेप खात मसाला गुटखा वगैरे खातेय असं भासवण्याची प्रॅक्टिस…(ह्या दिवशी पहिल्यांदा मेकअप केला होता… सुंदर दिसण्यासाठी नाहीत अर्थात..)”, असे कॅप्शन प्राजक्ताने दिले आहे.

आणखी वाचा : “आम्हाला एखाद्या राक्षसासारखं…”, NCB अधिकाऱ्यासमोर बोलताना शाहरुखला झाले अश्रू अनावर

आणखी वाचा : “तुम्ही माझी इज्जत धुळीस मिळवली, मला तुरुंगात…”; आर्यनने एनसीबी अधिकाऱ्याला केला होता सवाल

हा व्हिडीओ प्राजक्ताने शेअर करण्याआधी प्रेक्षकांना प्रश्न पडला होता की प्राजक्ताने सीरिजमध्ये खरचं मलासा गुटखा खाल्ला होता का? आता प्राजक्ताने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर प्रेक्षकांना त्यांचे उत्तर मिळाले आहे.

आणखी वाचा : अँबर हर्डची ११६ कोटीची नुकसान भरपाई जॉनी डेप करणार माफ, पण ‘या’ अटीवर; वकिलांनी केला खुलासा

प्राजक्ता आणि तेजस्विनी या दोघींची ‘रानबाजार’ सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या बोल्ड आणि अत्यंत वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं गेलं. त्यांच्या कामापासून ते त्यांच्या भूमिकेवरून त्यांना ट्रोल करण्यात आलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prajakta mali raanabaazaar series ratna paan masala dcp