मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून घराघरात पोहोचली. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. सध्या प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसते. त्यासोबतच प्राजक्ता ही सध्या रानबाजार या वेबसिरीजमुळे चर्चेत आहे. यानंतर आता प्राजक्ता ही लवकरच वाय या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्ताने नुकतंच प्राजक्ताने एक पोस्ट शेअर केली आहे.

प्राजक्ता माळी हिने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक टिझर शेअर केला आहे. तिचा हा टिझर मुक्ता बर्वेच्या वाय या चित्रपटाचा आहे. हा टिझर पोस्ट करत तिने त्याला एक कॅप्शनही दिले आहेत. “मार्गावरी काटे जरी असंख्य, मला जखमांची तमा नाही, लाख अडथळे आले तरी आता माघारी वळणे नाही…, आता मागे न पाहता पुढे जाणे गरजेचे आहे. ‘ती’ घेऊन येतेय ‘वाय’ चा ट्रेलर, उद्या!”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

“प्राजक्ता तू…”, ‘रानबाजार’ पाहिल्यानंतर कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान वाय या चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत प्राजक्ता माळी ही झळकणार आहे. सत्य घटनांवर आधारित असलेल्या ‘वाय’ या चित्रपटात मुक्ता ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सध्या या चित्रपटाच्या पोस्टरची सोशल मीडियावर बरीच चर्चा पाहायला आहे.

“माझा पाठिंबा आहे…”, अभिनेत्री प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा अजित सुर्यकांत वाडीकर यांची आहे. तर या चित्रपटाची पटकथा आणि संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ आणि संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत. तर कार्यकारी निर्मात्याची धुरा विराज विनय मुनोत यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader