आज महाशिवरात्री त्यानिमित्ताने संपूर्ण देशभरात शंकराची पूजा केली जाते. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर महाशिवरात्री निमित्ताने फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. सगळ्यांची लाडकी असणारी अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर महाशिवरात्रीच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या सुरुवातीला एक व्हिडीओ आहे. यात तिथे उपस्थित असलेले पुजारी प्राजक्ताला प्रार्थना पूर्ण होण्यासाठी काय करायचे ते सांगताना दिसतात. तर त्यानंतर तिने काही फोटो शेअर केले आहेत. प्राजक्ताने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर ती प्रार्थना करत असल्याचं दिसत आहे.

आणखी वाचा : “Arrange Marriage म्हणजे मटका, मी जर लग्न केल तर…”; प्राजक्ता माळीचे वक्तव्य चर्चेत

आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…

ही पोस्ट शेअर करत प्राजक्ता म्हणाली, “नुकतीच मी ‘हरीहरेश्वराला’ जाऊन आले… (श्रीवर्धन जवळील) आणि खरंच प्रार्थना पुर्ण होतायेत, असं वाटतंय. हरीहरेश्वर – हरी (विष्णू), हर (शिव), ईश्वर (ब्रम्हा) अशी ३ स्वयंभू लिंग आहेत. मुळात हे मंदिर ३ डोंगरांच्या मध्ये वसलंय त्यामुळे त्याच हे नाव असावं अस मला वाटतं. तर; शिव हे तत्व (energy) आहे, असं आम्ही मानतो आणि ध्यानामार्गे त्या तत्वाच्या जवळ जाऊ पाहतो. तर आज उपास आणि महादेव दर्शनाव्यतिरिक्त ध्यान जरूर करा”, असे प्राजक्ता म्हणाली. पुढे YouTubeवर art of livingचे अनेक guiding meditation videos आहेत, ते पाहा असे देखील प्राजक्ताने सांगितले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prajakta mali shared a post on maha shivratri and says it feels like prayers are being fulfilled dcp