मराठी मनोरंजन सृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे अभिनयाव्यतिरिक्त दुसऱ्या व्यवसायातही आपलं नशीब आजमावत आहेत. आता नुकताच या यादीमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव सामील झालं आहे. मालिका वेब सिरीज चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या प्राजक्ताने कालच ‘प्राजक्तराज’ या तिच्या नवीन ज्वेलरी ब्रँडचं उद्घाटन केलं. यावेळी आपल्या ज्वेलरी ब्रँड च नाव तिने ‘प्राजक्तराज’च का ठेवलं हे तिने सांगितलं आहे.

‘प्राजक्तराज’ची गेले अनेक दिवस चर्चा होती. प्राजक्ता ही गेले अनेक दिवस त्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत होती. पण ‘प्राजक्तराज’ हा तिचा नवीन ज्वेलरी ब्रँड असेल असं याच्या नावावरून कोणाच्याही लक्षात आलं नाही. तिच्या ब्रँडच्या या नावाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता हे नाव ठेवण्यामागची गोष्ट तिने काल सांगितली.

amit thackeray on raj thackeray cried
“…तेव्हा मी राज ठाकरेंच्या डोळ्यात पहिल्यांदा अश्रू बघितले”, अमित ठाकरेंनी सांगितला भावनिक प्रसंग!
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
Eknath Shinde On Uddhav Thackeray :
Eknath Shinde : “बंद सम्राटांना कायमचं…”, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मुंबईच्या सभेतून इशारा
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची टीका, “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला..”
Amit Thackeray Raj Thackeray
Raj Thackeray : “ती बातमी आली अन्…”, राज ठाकरेंनी सांगितली अमित ठाकरेंना निवडणुकीला उभं करण्यामागचं कारण
Uddhav Thackeray on Gadgebaba
Uddhav Thackeray : “संत गाडगेबाबा घरी यायचे, दरवाजाबाहेर उभं राहून…”, उद्धव ठाकरेंनी सांगितला आजोबांच्या काळातील आठवण

आणखी वाचा : Video: रितेश देशमुखच्या प्रश्नाचं करीना कपूरने दिलं मराठीत उत्तर, म्हणाली…; व्हिडीओ व्हायरल

प्राजक्ता म्हणाली, “मला सगळ्यांनी या ज्वेलरी ब्रँडचं नाव ‘प्राजक्तसाज’ असं सुचवलं होतं. पण ते नाव न निवडता मी ‘प्राजक्तराज’ हे नाव निवडलं. ‘प्राजक्तसाज’ हे छान नाव आहे पण त्यावरून लगेच कळतं की हा दागिन्यांचा ब्रँड असेल. म्हणून मी हे नाव ठेवलं नाही. तर ‘राज’ या शब्दात एक भारदस्तपणा आहे, या शब्दाला एक वजन आहे. कुठल्याही शब्दाला ‘राज’ जोडलं की त्याचं वजन वाढतं. एखादा देखणा मुलगा असेल तर त्याला आपण राजबिंडा असं म्हणतो. तसंच माझ्या दागिन्यांचंही आहे. म्हणून याला ‘प्राजक्तराज’ हे नाव दिलं.

हेही वाचा : प्राजक्ता माळीने सुरु केला ज्वेलरी ब्रँड; उद्घाटनाला मनसे प्रमुख राज ठाकरेंची विशेष उपस्थिती

काल प्राजक्ताच्या या नवीन ज्वेलरी ब्रँडचा उद्घाटन सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. या सोहळ्याला मनसे प्रमुख राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती. तसंच या सोहळ्याला राज ठाकरेंच्या बरोबरीने त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे, इतिहासकार विश्वास पाटील आणि प्राजक्ताचा मित्रपरिवार उपस्थित होता.