सर्वांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत असते. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. दिवाळी निमित्ताने चाहत्यांना एक मेसेज देत प्राजक्ताने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

प्राजक्ताने हे फोटो तिच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्राजक्ताने निळ्या आणि हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती. हा फोटो शेअर करत या दिवाळीला फटाके फोडू नका तर स्वत: पटाका व्हा, असे कॅप्शन प्राजक्ताने दिले आहे. प्राजक्ताचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

आणखी वाचा : ऐश्वर्याच्या ४८ व्या वाढदिवसाच्या बर्थडेपार्टीतील फोटो व्हायरल

आणखी वाचा : “आता जायची वेळ आली आहे…”, अपघातापूर्वीचा अनसीचा ‘तो’ व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय

प्राजक्ता माळी ही सध्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोचे सूत्रसंचालन करत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राती हास्यजत्राच्या संपूर्ण टीमने वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी प्राजक्ताने एक पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला होता. तिची ती पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती.

Story img Loader