चित्रपट निर्माते प्रकाश झा यांच्या आगामी ‘सत्याग्रह’ चित्रपटात ‘अय्यो जी हमरी अटरिया में’ या आयटम सॉंगचा समावेश करण्यात आला आहे. समाजातील गंभीर विषयांवर चित्रपट बनवणारे ६१ वर्षीय प्रकाश झा म्हणाले, हे गाणे कथेशी संवेदनशीलपणे जोडले असल्याने चित्रपटात सदर गाण्याचा समावेश करणे गरजेचे होते. ते पुढे म्हणाले, हे गाणे कथेला सुद्धा मदत करणार असून, या गाण्यामुळे भ्रष्टलोकांची मानसिकता समजवण्यास मदत होणार आहे. त्याशिवाय सत्याग्रह चित्रपटातील हे गाणे भ्रष्ट लोकांचा दबदबा आणि त्यांची मिलीभगत याचा माहोल दर्शविते. या आयटम सॉंगमध्ये नताशा स्तानकोविक दिसणार असून, ती ठुमरी-इलेक्ट्रॉनिकचे फ्यूजन सादर करणार आहे. ‘सत्याग्रह’ २१ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात दाखल होत आहे.
प्रकाश झांच्या ‘सत्याग्रह’मध्ये आयटम सॉंग
चित्रपट निर्माते प्रकाश झा यांच्या आगामी 'सत्याग्रह' चित्रपटात ‘अय्यो जी हमरी अटरिया में’ या आयटम सॉंगचा समावेश करण्यात आला आहे.

First published on: 10-07-2013 at 03:31 IST
TOPICSप्रकाश झाबॉलिवूडBollywoodसत्याग्रहहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 2 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash jha introduces item song in satyagraha