प्रकाश झा यांनी अण्णा हजारे यांच्या समर्थकांना सत्याग्रह चित्रपट दाखविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे झा विरुद्ध हजारे समर्थक असे चित्र उभे राहिले आहे.
प्रकाश झांचा आगामी चित्रपट सत्याग्रह हा अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी चळवळीवर आधारित असून त्यात अमिताभ बच्चन यांनी अण्णांची तर अजय देवगणने अरविंद केजरीवाल यांची भूमिका केली असल्याची चर्चा आहे. त्यावर, अण्णांच्या टीमने झा यांना चित्रपट दाखविण्यास सांगितले. मात्र, झा यांनी प्रदर्शनापूर्वी चित्रपट दाखविण्यास नकार दिला आहे.
तसेच, प्रकाश झा यांनी चित्रपट कोणावर आधारित आहे यावर वादविवाद करण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले की, सत्याग्रह चित्रपटातील भूमिका अण्णा हजारे किंवा केजरीवाल यांच्यावर आधारित नाहीत. राजनिती चित्रपटावेळी देखील हा चित्रपट राजीव आणि सोनिया गांधीवर आधारित असल्याची अफवा त्यावेळी होती. दरम्यान, अण्णांच्या समर्थकांना त्यांच्यावर चित्रपट केल्याची शंका असल्याची मला माहिती आहे. पण, माझा चित्रपट हा जिहाद विरुद्ध भ्रष्टाचारावर असून यात कोणत्याही राजकीय पक्ष किंवा व्यक्तीवर आधारित नाही. जसा लोकशाही आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्याचप्रमाणे लोकशाही विषयक चित्रपट बनविण्याचा प्रत्येक दिग्दर्शकाचा जन्मसिद्ध हक्क आहेत. भ्रष्टाचारविरोधी प्रत्येक चित्रपटामागे एक तर्कशास्त्र असते.
प्रदर्शनापूर्वीच आलेल्या राजकीय अडथळ्याबाबत चित्रपटाच्या लेखकाला विचारले असता तो म्हणाला, ३० ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्यांनी तिकीट विकत घेऊन चित्रपट बघावा. तेव्हा त्यांना कोणीही रोखणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा